एक्स्प्लोर

Similipal National Park | सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात अग्नितांडव, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

गेल्या आठवड्यापासून सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानाला (Similipal National Park ) आग लागली असून ती अद्याप नियंत्रणात आली नाही. सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी आणि हत्तींसाठी राखीव आहे.

भुवनेश्वर: गेल्या आठवड्यापासून ओडिशातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानाला आग लागली असून ती आग विझवण्यासाठी आता ओडिशा सरकारने एका उच्च स्तरीय दलाला पाचारण केलं आहे. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानातील आग काही केल्या नियंत्रणात येत नाही.

भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान असलेल्या ओडिशातील सिमलीपाल उद्यान आगीच्या भक्षस्थानी पडतंय. या राष्ट्रीय उद्यानातील 21 पैकी 8 रेंजमध्ये आग लागली आहे. भारतातील जैवविविधताच्या दृष्टीकोनातून हे राष्ट्रीय उद्यान अतिशय महत्वाचं आहे. या उद्यानाला गेले काही दिवस आग लागली असून त्याची चर्चा कुठेही होताना दिसत नाही. आता या प्रश्नावरुन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तात्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

सिमलीपाल नॅशनल पार्क हे 5569 वर्ग किमी मध्ये पसरले आहे. या नॅशनल पार्कमध्ये एलिफंट रिझर्व्ह आणि टायगर रिझर्व्ह आहे. तसेच या उद्यानात बंगाल टायगर, आशियन हत्ती, गौर यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आढळते. युनेस्कोने 2009 साली सिमलीपालला वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फीयर रिझर्व्हच्या लिस्टमध्ये सामिल करण्यात आलं आहे.

ऊसतोड करत नाहीत म्हणून शेतकऱ्यानं पेटवला ऊस, तर ही स्टंटबाजी असल्याचा कारखान्याचा पलटवार

सिमलीपाल हे जैवसंपत्तीची खाण आहे. जैवविविधतेच्या बाबतीत सिमलीपाल हे देशातील तिसरे सर्वात मोठे बायोस्पीयर रिझर्व्ह आहे. सिमलीपाल हे राष्ट्रीय उद्यान हत्ती आणि वाघांसाठी राखीव उद्यान आहे. या उद्यानात जवळपास वन्य पक्षांच्या 304 प्रजाती आहेत.

या उद्यानात अवैध्यपणे शिकारी केल्या जातात अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु असते. मयूरभंजच्या या जंगलात गेल्या आठवड्यात 50 किलो हत्ती दंत तस्करांकडे सापडले होते. या व्यतिरिक्त या जंगल परिसरात खाणकाम आणि अवैध्यपणे लाकडांची तस्करी करण्यात येते. त्याकडे प्रशासन डोळेझाक करते असा आरोप केला जातो.

फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार ओडिशातील जंगलात 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या काळात 5,291 घटना नोंद करण्यात आल्या आहेत. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या मते ही आकडेवारी देशात सर्वाधिक आहे.

बांबू रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटरला लागलेल्या आगीतून संशयाचा धूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSchool Uniform Special Report :विद्यार्थ्यांच्या गणवेशावरुन वाद, Rohit Pawar - Deepak Kesarkar भिडलेLadki Bahin Yojana Scam Special Report : सेवा केंद्रांनीच बहिणींना लुटलं, लाडकी बहीण योजनेत घोटाळा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
October Monthly Horoscope 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
Embed widget