एक्स्प्लोर
दिल्लीत 4 ते 15 नोव्हेंबर दरम्यान वाहतुकीसाठी Odd-Even चा नियम, प्रदूषण नियंत्रणासाठी केजरीवाल सरकारचा निर्णय
प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या काळात दिल्लीतील जनतेला सरकारकडून प्रदुषणापासून बचावासाठी मास्क देखील वाटण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत वाहतुकीसाठी पुन्हा एकदा Odd-Even नियम लागू करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. 4 ते 15 नोव्हेंबर दरम्यान दिल्लीतील वाहतुकीसाठी हा नियम लागू असणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या काळात दिल्लीतील जनतेला सरकारकडून प्रदुषणापासून बचावासाठी मास्क देखील वाटण्यात येणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या नियमानूसार वाहनाच्या नंबर प्लेटवरील शेवटचा आकडा ऑड(1,3,5,7,9) असेल तर महिन्याच्या 5,7,11,13 आणि 15 तारखेला वाहन चालवता येणार आहे. तर वाहनाच्या नंबर प्लेटवरील शेवटचा आकडा इवन(2,4,6,8) असेल तर महिन्याच्या 4,6,8,10,12,14 तारखेला गाडी चालवता येणार आहे.Delhi Chief Minister Arvind Kejriwal: Odd-Even vehicle scheme to be implemented from 4th to 15th November, 2019. pic.twitter.com/qVmLChGHsd
— ANI (@ANI) September 13, 2019
तसेच दिवाळीच्या निमित्ताने फटाके न फोडण्याचं देखील त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. दिल्लीतील प्रदुषणावर नियंत्रणासाठी केजरीवाल सरकारकडून 'विंटर अॅक्शन प्लान' तयार करण्यात आला आहे. यामध्ये ऑड-इवन वाहतूक नियमासह मोफत मास्क, कचरा जाळण्यास प्रतिबंध, प्रदूषणमुक्त दिवाळी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र दिल्लीत ऑड-इवनची गरज नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही बनवलेल्या रिंग रोडमुळे दिल्लीतील प्रदूषण बरेच कमी झाले आहे. येत्या 2 वर्षात ते आणखी कमी होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.#WinterActionPlan ????
???? सामूहिक तौर पर प्रदूषण-मुक्त दीवाली मनाएगी @ArvindKejriwal सरकार ????Odd-Even फिर होगी लागू ????मुफ़्त मास्क होंगे उपलब्ध ????लागू होगा Hotspot Action Plan ????कचरे में आग लगाने पर लगेगा प्रतिबंध ????धूल का होगा उचित नियंत्रण ????दिल्ली सरकार लाएगी 'Tree Challenge' pic.twitter.com/pPlvP9CbBT — AAP (@AamAadmiParty) September 13, 2019
#WATCH:Union Minister Nitin Gadkari on Odd-Even scheme says,"No I don't think it is needed.Ring Road we built has significantly reduced pollution in city&our planned schemes will free Delhi of pollution in next 2 yrs. It's their (Delhi govt) decision if they want to implement it" pic.twitter.com/mKlLIISpzX
— ANI (@ANI) September 13, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement