एक्स्प्लोर

NV Ramana : राजकीय प्रतिनिधी बदलतील, तुम्ही मात्र कायम आहात, सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी सीबीआयला सुनावलं

सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी सीबीआयच्या विश्वासार्हतेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. याबाबत बोलताना त्यांनी सीबीआयला खडे बोल सुनावले आहेत.

Chief Justice NV Ramana  : देशातील प्रमुख तपास यंत्रणा असलेल्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या निःपक्षपातीपणावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सीबीआयच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्यामुळं सामाजिक वैधता आणि सार्वजनिक विश्वास पुन्हा मिळवणे ही काळाची गरज आहे. राजकीय अधिकारी बदलतील, तुम्ही मात्र, कायम आहात असे खडे बोल रमणा यांनी सीबीआयला सुनावले आहेत. 

दिल्लीतील एका कार्यक्रमात एन व्ही रमणा बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. कृती आणि निष्क्रियतेमुळं केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे ते म्हणालेत. तपास यंत्रणांना स्वतंत्र, स्वायत्त बनवणे ही काळाची गरज आहे. एकाच गुन्ह्याचा तपास अनेक एजन्सींकडून केल्यानं त्रास होतो. गुन्हा दाखल झाला की, त्याचा तपास कोणती एजन्सी करणार हे ठरवावे. आजकाल एकाच प्रकरणाची अनेक एजन्सीद्वारे चौकशी केली जाते. यामुळं संस्थेला छळवणुकीचे साधन म्हणून दोष देण्यापासून वाचवले जाईल. अहवाल आल्यानंतर कोणत्या एजन्सीने तपास हाती घ्यायचा हे संस्थेने ठरवावं, असेही सरन्यायाधीस म्हणाले. जेव्हा तुम्ही नतमस्तक होणार नाही तेव्हा तुम्ही शौर्यासाठी ओळखले जाल, असेही एन व्ही रमणा म्हणाले.

सत्ताधारी नेत्यांकडून पोलिसांचा गैरवापर करणे ही नवीन बाब नाही. पोलिसांवर सामान्यतः कायद्याचे राज्य राखण्याचे काम असते. आणि विशेष म्हणजे ते न्याय वितरण प्रणालीचा अविभाज्य भाग असतात. पोलिसांना पूर्ण स्वायत्तता द्यावी, ही आग्रहाची मागणी आहे. सर्व संस्थांनी लोकशाही मूल्यांचे पालन आणि बळकटीकरण केले पाहिजे. कोणत्याही हुकूमशाही प्रवृत्तींना वाढू देऊ नये. न्यायपालिकेच्या निःपक्षपातीपणामुळे तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याच्या विनंत्यांचा पूर आला आहे. परंतू कालांतराने इतर संस्थांप्रमाणेच सीबीआयचीही कठोर तपासणी झाली पाहिजे असेही रमणा यावेळी म्हणाले. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. अनेकदा पोलिस अधिकारी आमच्याकडे येतात आणि सरकार बदलल्यानं त्रास होत असल्याची तक्रार करतात. परंतू तुम्ही हे लक्षात ठेवावं की, लोकप्रतिनिधी काळाबरोबर बदलत राहतात, पण तुम्ही कायमस्वरुपी आहात असे रमणा म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget