PM मोदी भजन-किर्तनात लीन होतात तेव्हा..! संत रविदास जयंतीनिमित्त दिल्लीत केली पूजा
करोलबाग येथील संत रविदास मंदिरात आज PM नरेंद्र मोदींनी केली पूजा, महिलांसोबत केले भजन कीर्तन
PM Modi in Shri Guru Ravidas Vishram Dham Mandir: आज संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील करोलबाग (karolbaug) येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात पूजा व प्रार्थना केली. यानंतर पीएम मोदींनी मंदिर परिसरात उपस्थित महिलांसोबत भजन कीर्तन केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. यावेळी पीएम मोदी तेथील नागरिकांना भेट दिली आणि त्यांच्याशी संवादही साधला
पंतप्रधान मोदींनी महिला भाविकांसोबत केले भजन-किर्तन
संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोलबाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात भाविकांसह भजनात भाग घेतला. यावेळी पीएम मोदी भक्तांसोबत बसून टाळ वाजवताना दिसले.
Very special moments at the Shri Guru Ravidas Vishram Dham Mandir in Delhi. pic.twitter.com/PM2k0LxpBg
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2022
संत रविदास हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान : पंतप्रधान मोदी
याआधी काल पीएम मोदींनी संत रविदासांची पूजा करतानाचे अनेक फोटो ट्विटरवर पोस्ट केले होते. पीएम मोदींनी लिहिले की, " आज महान संत गुरु रविदासजींची जयंती आहे. समाजातून जात, अस्पृश्यता यांसारख्या कुप्रथा दूर करण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे आपले जीवन समर्पित केले, ते आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या निमित्ताने मला संत रविदासजींच्या पवित्र स्थानाबद्दल काही गोष्टींची आठवण झाली. सन 2016 आणि 2019 मध्ये मला येथे नमन करण्याचा आणि लंगर घेण्याचा बहुमान मिळाला. या तीर्थक्षेत्राच्या विकास कामात कोणतीही कमतरता पडू देणार नाही, असा निर्धार मी खासदार या नात्याने केला होता.
पठाणकोटमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा
करोलबागमध्ये पूजा केल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट पंजाबमधील पठाणकोटला रवाना झाले. पठाणकोटमध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्याच वेळी, आम आदमी पार्टी (आप) निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जालंधरमधील रविदास मंदिरात जाऊन रोड शो करणार आहेत.
रविदास जयंती के पुण्य अवसर पर आज मैंने दिल्ली के श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिर जाकर दर्शन किए।
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2022
सभी देशवासियों को रविदास जयंती की शुभकामनाएं। pic.twitter.com/RbVj9wUB1k