एक्स्प्लोर

लग्नाचं वचन देऊन शारीरिक संबंध : सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी सेल्स टॅक्समध्ये सहाय्यक आयुक्त महिलेची याचिका या आधारावर फेटाळली. या संबंधांमुळे पुढे काही साध्य होणार नाही, हे महिलेला माहित असूनही तिने परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवले तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत परस्पर सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना लग्नाचं खोटं वचन देऊन बलात्कार केला, असं बोलता येणार नाही.

नवी दिल्ली : परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, "या संबंधांमुळे पुढे काही साध्य होणार नाही, हे महिलेला माहित असूनही तिने परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवले तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत परस्पर सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना लग्नाचं खोटं वचन देऊन बलात्कार केला, असं बोलता येणार नाही." न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी सेल्स टॅक्समध्ये सहाय्यक आयुक्त महिलेची याचिका या आधारावर फेटाळली. महिलेने सीआरपीएफमधील डेप्युटी कमांडंटवर लावलेले बलात्काराचे आरोपही दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने फेटाळले. कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, "दोघांचे आठ वर्षांपेक्षा जास्त काळ प्रेमसंबंध होते. या काळात दोघे अनेकदा एकमेकांच्या घरी थांबले, यावरुन हे स्पष्ट होतं की, हे संबंध परस्पर सहमतीने बनले होते." महिला आणि पुरुष एकमेकांना ओळखत होते "मी सीआरपीएफच्या अधिकाऱ्याला 1998 पासून ओळखत होते," असं तक्रारदार महिलेने सांगितलं. "तसंच 2008 मध्ये लग्नाचं वचन देऊन अधिकाऱ्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले," असा आरोप तिने केला आहे. 2016 पर्यंत दोघांमध्ये संबंध होते आणि यादरम्यान ते अनेक दिवस एकमेकांच्या घरीही राहिले होते. तक्रारदार महिलेचं म्हणणं आहे की, "2014 मध्ये अधिकाऱ्याने जातीच्या आधारावर माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला." यानंतरही दोघांमध्ये 2016 पर्यंत संबंध होते. अधिकाऱ्याने दुसऱ्या महिलेसोबत साखरपुडा केल्याची माहिती मिळाल्यानंतर महिलेने 2016 मध्ये अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. वचन न पाळणं म्हणजे खोटं वचन नाही : सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं की, "वचन देणं आणि काही परिस्थितीत ते पूर्ण न करणं याला फसवणूक करणं असं म्हणता येणार नाही. लग्नाचं खोटं वचन देऊन एखाद्या पुरुषाचा इरादा महिलेचा विश्वास संपादन करण्याचा असतो. खोटं वचन देऊन महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणं आणि परस्पर सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणं याबाबत चुकीचा समज आहे. खोटं वचन देऊन फसवणूक करणं ही अशी स्थिती आहे, ज्यात वचन देणाऱ्या पुरुषाच्या मनात शब्द देताना तो पाळण्याचा इरादाच नसतो. महिलेला लग्नामधील अडसर माहित होती : कोर्ट कोर्टाने आरोपपत्राचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर म्हटलं की, "2008 मध्ये दिलेलं लग्नाचं वचन 2016 मध्ये पूर्ण होऊ शकलं नाही. केवळ या आधारावर लग्नाचं वचन केवळ शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दिलं होतं, हे म्हणता येणार नाही. तक्रारदार महिलेलाही माहित होतं की, लग्नामधला अडसर काय आहे. तिला सगळी परिस्थिती माहित होती."

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: दोन महिन्यांपूर्वी मैत्री, एक महिन्यापासून लिव्ह-इनमध्ये; मोबईलवरील चॅटिंग संशय अन् थरार; 16 वर्षांच्या मुलानं लिव्ह-इन पार्टनरला संपवलं; काका-भावाच्या मदतीने मृतदेह पुरला पण...
दोन महिन्यांपूर्वी मैत्री, एक महिन्यापासून लिव्ह-इनमध्ये; मोबईलवरील चॅटिंग संशय अन् थरार; 16 वर्षांच्या मुलानं लिव्ह-इन पार्टनरला संपवलं; काका-भावाच्या मदतीने मृतदेह पुरला पण...
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Abhijeet Dipke Parents: मोदींना देवाने सद्बुद्धी द्यावी, ते कुणाच्या मरणाची वाट पाहतायत? लेकरू नाही, बायको नाही, कसली दया, माया नाही ते..., दिपकेंच्या आई-वडीलांचा संताप, उपोषणाला बसणार
मोदींना देवाने सद्बुद्धी द्यावी, ते कुणाच्या मरणाची वाट पाहतायत? लेकरू नाही, बायको नाही, कसली दया, माया नाही ते..., दिपकेंच्या आई-वडीलांचा संताप, उपोषणाला बसणार
Gold Silver Price Today: सोने-चांदीचे दर आज स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव
सोने-चांदीचे दर आज स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Embed widget