एक्स्प्लोर

27 November In History : नोबेल पुरस्काराची तरतूद, क्रिकेटसाठी काळा दिवस, फिलीप ह्यूजचा बाऊन्सर लागून मृत्यू; आज इतिहासात

Today In History : भारताचे दहावे पंतप्रधान व्ही पी सिंह यांचे निधन 27 नोव्हेंबर 2008 रोजी निधन झाले. तसेच भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अॅडमिरल सुशील कुमार यांचेही निधन 27 नोव्हेंबर रोजी झाले. 

27 November In History : नोबेल पुरस्काराच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. डायनामाईटचा शोध लावणाऱ्या अल्फ्रेड नोबेलने 27 नोव्हेंबर 1895 रोजी त्याच्या मृत्यूपत्रात नोबेल पुरस्काराची तरतूद केली आणि त्यासाठी आपली संपत्ती दिली. त्यानंतर 1901 रोजी नोबेल पुरस्काराची सुरूवात झाली. 

1895 : नोबेल पारितोषिकांची तरतूद

मानवजातीच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना दरवर्षी नोबेल पुरस्कार (Nobel Prize) देण्यात येतो. त्याची सुरूवात जरी 1901 साली झाली असली तरी त्यासंबंधित नोबेल यांच्या मृत्यूपत्रात नोंद मात्र 27 नोव्हेंबर 1895 रोजी करण्यात आली. डायनामाईटचा शोध लावणाऱ्या अल्फ्रेड नोबेल (Alfred Nobel) यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात तशी तरतूद केली. त्यानंतर 1896 साली त्यांचा मृत्यू झाला.

1907 : प्रसिद्ध कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांचा जन्म 

प्रसिद्ध कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांचा जन्म  27 नोव्हेंबर 1907 रोजी प्रयागराज म्हणजे पूर्वीचे अलाहाबाद या ठिकाणी झाला. अमिताभ बच्चन यांचे ते वडील होते. हिंदी साहित्यातील त्यांचे योगदान नेहमीच कौतुकास्पद राहील.  हरिवंश राय यांनी 1938 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एमए केले आणि 1952 पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात लेक्चरर म्हणून काम केले.  1952 मध्ये पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले, तेथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात इंग्रजी साहित्य/कवितेवर संशोधन केले. 

सन 1955 मध्ये केंब्रिजहून परत आल्यानंतर त्यांची भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात हिंदी तज्ञ म्हणून नियुक्ती झाली. ते राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य देखील होते. 1976 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पूरस्कार मिळाला. त्याआधी त्यांना 1968 मध्ये 'दो चटणें' (कविता संग्रह) साठी साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता. हरिवंशराय बच्चन यांचे 18 जानेवारी 2003 रोजी मुंबईत निधन झाले.

1975 : बीबीसीचे रॉस मॅकक्वेस्टर यांची गोळ्या झाडून हत्या 

बीबीसीचे कार्यक्रम सादरकर्ते प्रेझेंटर रॉस मॅकक्वेस्टर यांची 27 नोव्हेंबर 1975 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक म्हणूनही ओळखले जाते.

1940 :  मार्शल आर्ट मास्टर ब्रूस लीचा जन्म (Bruce Lee Birthday) 

अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट मास्टर ब्रूस ली याचा 27 नोव्हेंबर 1940 रोजी जन्म झाला. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जन्मलेला आणि हाँगकाँगमध्ये वाढलेला ब्रूस हा मार्शल आर्टमध्ये मास्टर होता.  70 च्या दशकात त्याने अनेक मार्शल आर्ट चित्रपटांमध्ये काम केले आणि जगभरात या कलेचा प्रसार केला. 

1986 : भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचा जन्मदिन

भारतीय क्रिकेट संघाचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) याचा जन्म 27 नोव्हेंबर 1986 रोजी झाला. सुरेश रैनाने 226 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 5 हजार 615 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके, 36 अर्धशतकांचा समावेश आहे.  रैनाने 78 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 1 हजार 604 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच सुरेश रैनाने 193 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 5 हजार 368 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक, 38 अर्धशतक केले आहेत. त्याने 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.  

2001 : हबल दुर्बिणीने सूर्यमालेच्या बाहेरील ओसायरिस ग्रहावर हायड्रोजन समृद्ध वातावरण शोधले

हबल दुर्बिणीने 27 नोव्हेंबर 2001 रोजी सूर्यमालेच्या बाहेरील ओसायरिस ग्रहावर हायड्रोजन समृद्ध वातावरण शोधले. असे वातावरण असलेला हा सौरमालेबाहेरील पहिला ग्रह आहे.

 2008 :  भारताचे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचे निधन 

विश्वनाथ प्रताप सिंह (Vishwanath Pratap Singh) हे भारताचे दहावे पंतप्रधान होते. 27 नोव्हेंबर 2008 रोजी त्यांचे निधन झाले.  2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990 या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधानपद भुषवले. त्यांचा जन्म 25 जून 1931 रोजी प्रयागराज जिल्ह्यातील बेलन नदीच्या काठी वसलेल्या दैया येथे राजपूत जमीनदार घराण्यात झाला. त्यांनी कर्नल ब्राउन केंब्रिज स्कूल, देहरादून येथून शिक्षण घेतले आणि अलाहाबाद विद्यापीठातून कला व कायदशास्त्राची पदवी घेतली. ते अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि नंतर पुणे विद्यापीठाच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्र विषयात पदवी घेतली. सिंह हे 19969 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेवर सोरांव येथून काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून निवडून गेले. 1971 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले आणि 1974 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाणिज्य उपमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली.  

 2014 :  ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलीप ह्यूजचा बाऊन्सर लागून मृत्यू 

क्रिकेटच्या खेळात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये दररोज बनवलेल्या विक्रमांची खूप चर्चा होते. परंतु कधीकधी असे काहीतरी घडते ज्याची इतिहासात वेगळी नोंद होते. 27 नोव्हेंबर 2014 रोजी अशीच घटना घडली होती. ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्यूजचा (Phillip Hughes) एका सामन्यादरम्यान डोक्याला बाउन्सर लागल्याने मृत्यू झाला होता.  याआधीही विविध देशांच्या खेळाडूंना फलंदाजी करताना किंवा क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागून आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये भारताचा फलंदाज रमन लांबाचा समावेश आहे. चार कसोटी आणि 32 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रमण लांबा यांचा 1998 मध्ये ढाका येथे क्लब सामन्यात क्षेत्ररक्षण करताना डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला होता. 

2019 : भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अॅडमिरल सुशील कुमार यांचे निधन  

भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अॅडमिरल सुशील कुमार यांचे 27 नोव्हेंबर 2019 रोजी निधन झाले. ते  1998 ते 2000 दरम्यान भारतीय नौदलाचे प्रमुख होते. सुशील कुमार यांनी 1965 आणि 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्ध युद्धही केले होते. गोवा मुक्तिसंग्रामातही त्यांचा सहभाग होता. त्यांचे युद्धकौशल्य पाहून त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक देण्यात आले. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड

व्हिडीओ

Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Embed widget