एक्स्प्लोर
तुमच्याकडे किती सोनं? सरकारची करडी नजर

नवी दिल्ली : गृहिणींनी त्यांच्या घरगुती बचतीतून किंवा आधीच कर भरलेल्या उत्पन्नातून, खरेदी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जप्ती करण्याचा सरकारचा कसलाही विचार नाही, याबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्या या अफवा आहेत, असं आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे.
लोकसभेत संमत करण्यात आलेल्या सुधारित आयकर कायद्याच्या अनुषंगाने सरकारने काही महत्त्वाची स्पष्टीकरणे जारी केली आहेत.
बेहिशेबी मालमत्ता बाळगणारे अनेकजण आपला काळा पैसा रोख स्वरूपात न ठेवता तो सोनं किंवा रियल इस्टेटच्या रूपात साठवून ठेवतात. मात्र आता तुम्हाला तुमचा बेहिशेबी पैसा सोन्यामध्ये साठवण्यापूर्वी अनेकदा विचार करावा लागणार आहे.
लोकसभेत संमत करण्यात आलेल्या सुधारीत आयकर कायद्यानुसार, आयकर विभागाच्या छाप्यात, घरातील पारंपरिक किंवा पूर्वजांपासून पिढ्यानपिढ्या असलेल्या सोन्याच्या दागिन्यांशिवाय, प्रत्येक विवाहित महिलेला 500 ग्रॅम म्हणजे 50 तोळे, अविवाहित स्त्रीला 250 ग्रॅम म्हणजे 25 तोळे आणि पुरुषाकडे 100 ग्रॅम म्हणजे 10 तोळ्यांपेक्षा जास्त सोने जप्त केलं जाऊ शकतं. याचाच अर्थ विवाहित महिलांना 50 तोळे, अविवाहित महिलांना 25 तोळे आणि पुरुषांना फक्त 10 तोळे घरात ठेवता येणार आहे. यापेक्षा जास्त सोन्याचे दागिने घरात असतील तर त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.
अर्थात हे फक्त आयकर विभागाचा छापा पडेल तेव्हाच... म्हणजे तुमचं उत्पन्न ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त किंवा बेहिशेबी असेल तरच तुमच्या घरावर छापा पडेल. त्यावेळी तुमच्याकडे निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सोनं आढळलं तर मात्र तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागेल.
त्याचवेळी तुम्ही तुमच्या कायदेशीर उत्पन्नातून कितीही तुम्हाला हवं तेवढं सोनं खरेदी करू शकता, त्यावर कसलेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत.
घरात पूर्वजांपासून असलेले सोन्याचे दागिने किंवा महिलांनी आपल्या बचतीतून घेतलेल्या दागिन्यांवर कसलाही टॅक्स आकारला जाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
