एक्स्प्लोर

परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी 6 महिने थांबण्याची गरज नाही: सुप्रीम कोर्ट

परस्पर सहमीतनं घटस्फोटासाठी पती-पत्नीनं अर्ज केला असेल तर यापुढे त्यांना सहा महिने वाट पाहण्याची गरज नाही. असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

नवी दिल्ली : परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी यापुढे सहा महिने थांबणं अनिवार्य नसल्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं काल (मंगळवार) दिला आहे. हिंदू विवाह कायद्याचं कलम 13B (2) हे अनिवार्य नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. या कलमाअंतर्गत घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर 6 महिने वाट पाहावी लागते. याआधी घटस्फोटाचा पहिला अर्ज कोर्टासमोर आल्यानंतर दुसरा अर्ज दाखल करण्यासाठी 6 महिने वाट पाहावी लागत होती. पती-पत्नी पुन्हा एकत्र येऊ शकतात का? यावर विचार करता यावा यासाठी 6 महिन्यांचा हा कालावधी देण्यात आला होता. त्यासाठीच कायद्यात ही तरतूद करण्यात आली आहे. घटस्फोटाचा अर्ज दाखल झाल्यानंतर कोर्ट दोन्ही पक्षकारांना 6 महिन्यांचा वेळ देतात. या कालावधीनंतरही जर पती-पत्नी एकत्र राहण्यास तयार नसतील तर कोर्ट त्यांचा घटस्फोट मान्य करतं. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि यू यू ललित यांच्या खंडपीठानं सहा महिन्यांचा हा कालावधी देखील संपुष्टात आणला. यावेळी सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं की, 6 महिन्यांचा वेळ द्यायचा की नाही हे दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांवर अवलंबून असणार आहे. खास परिस्थितीत न्यायमूर्ती हे तात्काळ घटस्फोटाचे आदेशही देऊ शकतात. divorce-580x395 कोणत्या विशिष्ट परिस्थितीत तात्काळ घटस्फोटाचा आदेश देता येणार हे देखील सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
  1. घटस्फोटाचा अर्ज करण्याआधीच पती-पत्नी हे दीड वर्षापासून वेगवेगळे राहत असल्यास त्यांना तात्काळ घटस्फोट मिळू शकतो.
 
  1. पती-पत्नीमध्ये कोणत्याही प्रकारे समेट होण्याची शक्यता नसल्यास तात्काळ घटस्फोटाचा आदेश देता येईल.
 
  1. जर दोन्ही पक्षकारांनी पोटगी, मुलांवरील हक्क आणि इतर मुद्दे सामंजस्यानं सोडवले असतील तर त्यांचा तात्काळ घटस्फोट मान्य करता येईल.
 
  1. सहा महिन्यांचा कालावधी दोघांसाठी आणखी त्रासदायक ठरणार आहे असं वाटत असल्यास त्यांचा घटस्फोट तात्काळ मान्य करण्यात यावा.
  सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयात स्पष्टपणे म्हटलं आहे की, घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर पती-पत्नी वर दिलेल्या परिस्थितीचा संदर्भ देऊन तात्काळ घटस्फोटाची मागणी करु शकतात. हा निर्णय दिल्लीतील एका घटस्फोट प्रकरणावर देण्यात आला. 8 वर्षापासून पती-पत्नी हे वेगळे राहत होते. त्यानंतर त्यांनी तीस हजारी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. त्याआधीच त्यांनी पोटगी, मुलांवरील हक्क यासारखे प्रश्न आपआपसात सोडवले. पण तरीही न्यायमूर्तींनी त्यांना सहा महिने थांबण्यास सांगितलं. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात 6 महिने थांबणं अनिवार्य नसल्याचं म्हणत मोठा निर्णय दिला. तसेच देशातील सर्व कौटुंबिक न्यायलयानं आदेश दिले की, आता ते हिंदू विवाह कायद्याचं कलम 13B (2) हे अनिवार्य मानू नये. जर गरज वाटत असेल तर त्यांनी तात्काळ घटस्फोटाचे आदेश द्यावे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Embed widget