एक्स्प्लोर

CAA मुस्लीमविरोधी नाही, काँग्रेसच्या षडयंत्रापासून सावध रहा : नितीन गडकरी

काँग्रेसने मुस्लिमांना केवळ व्होट मशीन म्हणून वागणूक दिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सुरु असलेल्या अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन गडकरी यांनी देशवासियांना केले आहे.

नागपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ आज (22 डिसेंबर) नागपुरात विराट मोर्चा काढण्यात आला. लोकाधिकार मंचच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.

मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या षडयंत्रापासून सावध राहा असा सल्ला देतानाच देशातल्या नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

गडकरी यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. गडकरी म्हणाले की, काँग्रेसने मुस्लिमांना केवळ व्होट मशीन म्हणून वागणूक दिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सुरु असलेल्या अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन गडकरी यांनी केले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा मुस्लीमविरोधी नसल्याचे गडकरी यांनी ठामपणे सांगितले.

हिंदू असणं पाप आहे का? असा सवाल करत नितीन गडकरी यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूच्या परिस्थितीवर भाष्य केले. गडकरी म्हणाले की, आपल्या देशातल्या मुस्लीम घुसखोरांना आश्रय देण्यासाठी या जगात 100 ते 150 मुस्लीम देश आहेत. परंतु पाकिस्तानातले हिंदू 19 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांवर आले आहेत. त्यांच्यासाठी या जगाच्या पाठीवर कोणताही देश नाही.

गडकरी म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडीत नेहरु यांनी शरणार्थींना आश्रय देण्याचे आश्वासन दिले होते. आपण ते पूर्ण केले पाहिजे. आपलो सरकार तेच काम करत आहे. आपले सरकार शरणार्थींना नागरिकत्व देत आहे. यामध्ये सरकारचं काय चुकलं? असा सवाल गडकरींनी उपस्थित केला.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनीदेखील CAA कायद्याला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. फडणवीस म्हणाले की, काही लोक जाणून बुजून लोकांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

पाहा काय म्हणाले नितीन गडकरी? पाहा CAA बद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget