एक्स्प्लोर

निपाह व्हायरसचं संकट, केरळमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

या व्हायरसची लागण झाल्याने केरळच्या कोझिकोडमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जणांवर उपचार सुरु आहेत. चिंतेची बाब म्हणजे, या विषाणूवर कोणताही उपचार होत नाही.

मुंबई : भारतात निपाह व्हायरसच्या रुपाने नवं संकट समोर उभं राहिलं आहे. या व्हायरसची लागण झाल्याने केरळच्या कोझिकोडमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जणांवर उपचार सुरु आहेत. चिंतेची बाब म्हणजे, या विषाणूवर कोणताही उपचार होत नाही. दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. यासाठी कालच केरळला डॉक्टरांचं पथक दाखल झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी दिली. मृतांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. आणखी 25 जणांच्या रक्ताच्या तपासणीमध्ये 'निपाह' विषाणू असल्याचं निष्पन्न झालंय. विषाणूची लागण होऊ नये यासाठी खजूर खाणं टाळले पाहिजे, त्याबरोबरच जमिनीवर पडलेली फळं खाणं टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. यावरुन राज्यभरात आरोग्य संस्थांना काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. निपाह व्हायरस कसा पसरतो? जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, निपाह व्हायरस (NiV) वेगाने पसरतो, जो मनुष्य आणि प्राण्यांमध्ये गंभीर आजाराला जन्म देतो. NiV च्या बाबतीत सर्वात अगोदर 1998 साली मलेशियातील कम्पंग सुगाई निपाह येथून माहिती मिळाली होती. तेव्हापासूनच या व्हायरसला हे नाव देण्यात आलं. त्यावेळी डुकरांपासून हा आजार पसरला जात होता. मात्र नंतर ज्या ज्या ठिकाणी हा व्हायरस आढळून आला, तिथे हा व्हायरस पसरण्यामागचं कोणतंही नेमकं कारण आढळून आलं नाही. बांगलादेशमध्येही 2004 साली काही लोकांना या व्हायरसची लागण झाली होती. बांगलादेशमधील या लोकांनी खजूरच्या झाडापासून मिळणारा द्रव पदार्थ खाल्ल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, या व्हायरसचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला झाल्याची उदाहरणं भारतातही पाहायला मिळाली आहेत. NiV मुळे श्वसन प्रक्रियेसंबंधी गंभीर आजार होतो. मनुष्य किंवा प्राण्यांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी आतापर्यंत कोणतीही लस तयार झालेली नाही. आजाराची लक्षणं काय? या आजाराची लक्षणं रुग्णाला 24 ते 48 तासामध्ये कोमात पोहोचवतात. आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला श्वास घेण्यासाठी त्रास होतो, तर काही रुग्णांना न्यूरोलॉजिकल समस्याही (मज्जासंस्थेसंबंधी) होते. 1998-99 सालामध्ये हा आजार पसरला तेव्हा जवळपास 265 जणांना या आजाराची लागण झाली होती, असं बोललं जातं. रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या जवळपास 40 टक्के रुग्णांना गंभीर आजार झाला होता, ज्यामुळे त्यांना वाचवता आलं नाही. सर्वसाधारणपणे वटवाघूळ, डुक्कर किंवा मनुष्यांद्वारे हा आजार पसरतो. मलेशिया आणि सिंगापूरमध्ये डुक्करांच्या माध्यमातून हा आजार पसरल्याचं समजलं होतं, तर भारत आणि बांगलादेशमध्ये मनुष्यांपासूनच या आजाराचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. काय काळजी घ्याल? या आजारापासून दूर राहण्यासाठी खजूर, खजूरच्या झाडापासून मिळणारा द्रव पदार्थ आणि झाडाखाली पडलेली फळं खाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय डुक्कर, आजारी घोडे किंवा इतर जनावरांपासून दूर राहणंही गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget