एक्स्प्लोर

टोल नाक्यावर गाडी 10 सेकंदांपेक्षा जास्त थांबू नये यासाठी NHAI च्या गाईडलाईन्स जारी

काही कारणास्तव 100 मीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या रांगा असल्यास टोल बूथपासून 100 मीटरच्या आत रांग येईपर्यंत वाहनांना टोल न भरताच पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल.

नवी दिल्ली : टोल प्लाझावर (Toll Plaza) वाहने सुरळीत व जलदगतीने जाण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर गर्दीच्या वेळीही प्रति वाहन 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही याच्या सुनिश्चिततेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. टोल प्लाझावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहने 100 मीटरपेक्षा जास्त रांगा लावून राहणार नाहीत याची खात्री देखील नवीन मार्गदर्शकतत्त्वे करतील. 

जरी बहुतांश टोल प्लाझावर फास्टॅग (FASTag) 100 टक्के अनिवार्य केल्यावर प्रतीक्षा कालावधी नसला तरीही काही कारणास्तव 100 मीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या रांगा असल्यास टोल बूथपासून 100 मीटरच्या आत रांग येईपर्यंत वाहनांना टोल न भरताच पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल. या उद्देशाने टोल बूथपासून 100 मीटर अंतरावर पिवळ्या रेषा प्रत्येक टोल मार्गिकेत चिन्हांकित केल्या जातील. टोल प्लाझा चालकांमध्ये याद्वारे त्यांच्या जबाबदारीची जाणीव होईल.

2021 फेब्रुवारीच्या मध्यापासून एनएचएआय यशस्वीरित्या 100 टक्के कॅशलेस टोलिंगमध्ये परिवर्तित झाले आहे, एनएचएआय टोल प्लाझा येथे एकूणच फास्टॅग प्रवेश 96 टक्के पर्यंत पोहोचला आहे आणि बर्‍याच टोल प्लाझावर 99 टक्के आहे. देशातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाचा (ईटीसी) वाढता वापर लक्षात घेता टोलवसुलीची कार्यक्षम व्यवस्था करण्यासाठी पुढील 10 वर्षांसाठी वाहतुकीच्या अंदाजानुसार नवीन डिझाईन बनवून आगामी टोल प्लाझा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.

सुरक्षित अंतर नियम ही नवी जीवनशैली झाल्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी फास्टॅग वापराचा पर्याय निवडत आहेत कारण यामुळे वाहनचालक आणि टोल चालक यांच्यात थेट संपर्क होण्याची शक्यता दूर होते. महामार्गांवरील वापरकर्त्यांद्वारे फास्टॅगचा वापर आणि त्यातील सातत्यपूर्ण वाढ उत्साहवर्धक असून टोल वसुलीत अधिक कार्यक्षमता आणण्यास मदत झाली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
Palghar News: सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
मोठी बातमी! सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar on Congress :  मुंबई पालिकेसाठी काँग्रेसचा 'स्वबळाचा' नारा: महाविकास आघाडीत तणाव! उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून नाराजी व्यक्त
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
Palghar News: सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
मोठी बातमी! सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
Chhatrapati Sambhajinagar: कल्पनाचा अफगाणी बॉयफ्रेंड अन् अमित शाहांच्या तोतया ‘ओएसडी’ला दिल्लीमध्ये अटक; रात्री उशिरा केली कारवाई, चौकशीदरम्यान तीची उडवाउडवीची उत्तरं
कल्पनाचा अफगाणी बॉयफ्रेंड अन् अमित शाहांच्या तोतया ‘ओएसडी’ला दिल्लीमध्ये अटक; रात्री उशिरा केली कारवाई, चौकशीदरम्यान तीची उडवाउडवीची उत्तरं
Sayaji Shinde on Nashik tree Cutting: झाडं आमची आई-बाप आहेत, त्यांच्यावर हल्ला केला तर गप्प बसणार नाही; सयाजी शिंदेंनी नाशिकच्या तपोवनात लढाईचं रणशिंग फुंकलं
झाडं आमची आई-बाप आहेत, त्यांच्यावर हल्ला केला तर गप्प बसणार नाही; सयाजी शिंदेंनी नाशिकच्या तपोवनात लढाईचं रणशिंग फुंकलं
Kolhapur News: कोल्हापुरात आरोग्यमंत्र्यांचे रौद्ररूप, अचानक सीपीआर रुग्णालयात भेट देत अधिकाऱ्यांची खरडपट्टी, म्हणाले, तुमचा पगार किती आणि तुम्ही काम करता किती?
कोल्हापुरात आरोग्यमंत्र्यांचे रौद्ररूप, अचानक सीपीआर रुग्णालयात भेट देत अधिकाऱ्यांची खरडपट्टी, म्हणाले, तुमचा पगार किती आणि तुम्ही काम करता किती?
Girish Mahajan on Tapovan Trees: आम्ही प्रत्येक पावसाळ्यात अनेक झाडं लावतो, तपोवनची जागा शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठी आरक्षित: गिरीश महाजन
साधुग्रामसाठी तपोवनातील फक्त रोपटी तोडणार, दुसरीकडे नवी झाडं लावायला 15 हजार खड्डे खणतोय: गिरीश महाजन
Embed widget