दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांचे निधन
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराणा यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. 2011 पासून त्यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास होत होता. ब्रेन स्ट्रोकमुळे ते कोमामध्ये होते. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मदनलाल खुराणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. खुराणा यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये दोन दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.
दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली खुराणा यांच्या निधनानंतर दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, "खुराणा हे दिल्ली भाजपचे मजबूत स्तंभ होते. त्यांचे निर्वासितांसाठीचे काम कायम लक्षात राहील", अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण केली. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ''दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराणा हे आदर्श स्वयंसेवक, समर्पित विद्यार्थी परिषद कार्यकर्ता आणि जनसंघ तसेच भाजपाचे एक मजबूत स्तंभ होते", असे म्हटले आहे. सोबतच केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, स्मृती इराणी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अनेक दिग्गजांनी खुराणा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.We all are deeply saddened to hear of the demise of veteran leader & former CM of Delhi Shri Madan Lal Khurana ji. As a mark of respect to the departed soul, state mourning shall be observed by Delhi govt for 2 days.
— Manish Sisodia (@msisodia) October 28, 2018
Shri Madan Lal Khurana Ji will always be remembered for the manner in which he strengthened the BJP in Delhi. He made unwavering efforts towards serving the post-partition refugees in Delhi. My thoughts and solidarity with his family and supporters.
— Narendra Modi (@narendramodi) October 28, 2018
कोण होते मदनलाल खुराणा? मदनलाल खुराणा 1993 ते 1996 या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते. वाजपेयी सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रीदेखील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून भाजपात आलेल्या खुराणा यांनी राजस्थानच्या राज्यपाल पदाची धुरा देखील सांभाळली होती. त्यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1936 मध्ये पंजाबच्या लयालपूर गावात झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर लयालपूर पाकिस्तानचा भाग झाला आणि फैसलाबाद असे त्याचे नामकरण झाले. खुराणा यांनी वयाच्या 12 व्या वर्षी लयालपूर येथून आपले घर सोडले आणि दिल्लीत आले. त्यांनतर ते इथेच रमले. विद्यार्थी दशेपासूनच त्यांचा राजकारणाशी संबंध आला. खुराणा यांचे राजकीय जीवन शेवटच्या काळात संघर्षाचे ठरले. खुराणा यांच्या मुलाचे मागील महिन्यात निधन झाले होते.दिल्ली के पूर्व मुख्यमंत्री और भाजपा के वरिष्ठ नेता मदनलाल खुराना जी के निधन का दुःखद समाचार प्राप्त हुआ। खुराना जी एक आदर्श स्वयंसेवक, एक समर्पित विद्यार्थी परिषद कार्यकर्ता व जनसंघ और भारतीय जनता पार्टी के एक मजबूत स्तम्भ के रूप में सदैव याद किये जायेंगे। pic.twitter.com/TG1I1fHQtT
— Amit Shah (@AmitShah) October 27, 2018