एक्स्प्लोर

NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट लातूरपर्यंत; बिहार कनेक्शनपाठोपाठ आता महाराष्ट्र कनेक्शन समोर, दोन शिक्षक ताब्यात

NEET Exam : वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नांदेडच्या एटीएस पथकानं लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतलं आहे.

NEET Paper Leak Case: लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak Case) दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच आज होणारी नीट पीजी परीक्षा (NEET PG Exam) पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health) घेतला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार (Bihar) कनेक्शननंतर आता महाराष्ट्र (Maharashtra News) कनेक्शन समोर आलं आहे. नीट (NEET Exam) पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांना नांदेड एटीएसनं (Nanded ATS) ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. दरम्यान, नांदेड एटीएसकडून दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे. 

वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (NEET) पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नांदेडच्या एटीएस पथकानं लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतलं आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नावं आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. 

वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत (NEET) घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का? या दृष्टीनं तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले. दोघांनाही तात्काळ एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलं. 

लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवासी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. तर लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूर येथे खाजगी कोचिंग क्लासेस चालवत होते अशी माहिती आहे. नांदेड एटीएसनं या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर काल (शनिवारी) रात्रभर कसून चौकशी केली. त्यानंतर या दोघांनाही नांदेडकडे घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे.

नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली 

नीट पीजी परीक्षार्थींसाठी मोठी बातमी आहे. आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. आज नीट पीजी परीक्षा पार पडणार होती, मात्र आता ही परीक्षा होणार नाही. नीट परीक्षेचा मुद्दा गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. अलिकडेच नीट परीक्षेमध्ये घोळ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नीट पीजी परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत शिक्षण विभागाने रविवारी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kedar Dighe on Dharmaveer 2 : दिघेंना संपवण्यात आलं?शिरसाटांच्या  दाव्यावर केदार दिघे काय म्हणाले?Sanjay Shirsat On Anand Dighe Death : आनंद दिघेंना मारलं गेलं, ठाणे जिल्ह्याला माहिती -शिरसाटAaditya Thackeray : सिनेटप्रमाणेच विधानसभेतही मोठा विजय मिळवणार : आदित्य ठाकरेVarun Sardesai on Senate Election: आमचीच खरी युवासेना हे सिद्ध झालं : वरुण सरदेसाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
Election Commission : 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती? महिला मतदार किती? तृतीयपंथीय वोटर किती? निवडणूक आयोगाने आकडेवारी मांडली
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती? महिला मतदार किती? तृतीयपंथीय वोटर किती? निवडणूक आयोगाने आकडेवारी मांडली
Pravin Tarde: 'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
'धर्मवीर 2' वरुन शिरसाट-दिघेंमध्ये जुंपली; आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत पुतण्यानं स्पष्टच सांगितलं
'धर्मवीर 2' वरुन शिरसाट-दिघेंमध्ये जुंपली; आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत पुतण्यानं स्पष्टच सांगितलं
Embed widget