एक्स्प्लोर

NEET EXAM 2020 : देशभरात जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांची 'परीक्षा', कोरोनाच्या सावटाखाली तयारी पूर्ण

लॉकडाऊनमुळं लांबलेली नीट 2020 ची परीक्षा आज रविवारी पार पडत आहे. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. देशभरातील 15 लाख विद्यार्थी 'नीट' मेडिकल प्रवेश परीक्षा देणार आहेत.

मुंबई : लॉकडाऊनमुळं लांबलेली नीट 2020 ची परीक्षा आज रविवारी पार पडत आहे. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. दुपारी 2 ते 5 दरम्यान ही परीक्षा होईल. यासाठी विद्यार्थ्यांना दुपारी 11 ते 1:30 दरम्यान प्रवेश दिला जाईल. देशभरातील 15 लाख विद्यार्थी 'नीट' मेडिकल प्रवेश परीक्षा देणार आहेत. महाराष्ट्रातील 2,28,214 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कोरोनाची वाढती संख्या पाहता योग्य खबरदारीचे उपाय म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्व उपाययोजना करून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तीन आधीपासून सेंटर्सवर स्लॉट्सनुसार हजर राहायला सांगितलं आहे. स्लोट्समध्ये विद्यार्थ्यांना बोलवून आतमध्ये थर्मल स्क्रिनिंग, मास्क, सॅनिटायजरचा वापर करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक करून या वातावरणात परीक्षा सर्व नियमांचे पालन करून घ्यावी लागत आहे.

नीट परीक्षेसाठी देशात 15.97 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या 2546 वरुन वाढवत 3843 इतकी केली आहे. तर प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या 24 वरुन 12 करण्यात आली आहे.

ही परीक्षा पुढं ढकलण्यासाठी पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड आणि  झारखंड राज्यातील सहा मंत्र्यांनी याचिका दाखल केली होती मात्र सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली होती. प्रत्येकवर्षी ही परीक्षा मे महिन्यात पार पडते. पण लॉकडाऊनळं यंदा ही परीक्षा पुढं ढकलण्यात आली. त्यामुळे नीटची परीक्षा नेमकी घेतली जाणार का? घेतली जाणार असेलच तर ती कधी घेतली जाणार? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात होते. याची उत्तरं अधांतरीच होती. त्यामुळे विध्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती.

यावरून अनेकदा राजकारण ही रंगलं, शेवटी न्यायालयाने परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि विध्यार्थी अभ्यासाला लागले. बघता-बघता आता परीक्षा तोंडावर आली. पण आता विद्यार्थ्यांना चिंता सतावत आहे ती त्यांना परीक्षा केंद्रावर कोरोनाची लागण तर होणार नाही ना? त्यामुळेच परीक्षा केंद्रावर त्यांना नेमक्या कोणत्या सुविधा उपलब्ध असतील आणि विद्यार्थ्यांनी सोबत काय न्यायला हवं. याबाबत एका खाजगी संस्थेने विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे.

विद्यार्थ्यांनी न विसरता सोबत न्यायच्या वस्तू

1. अॅडमिट कार्ड 2. एक पासपोर्ट साईज फोटो 3. फोटो ID, शक्यतो आधार कार्ड 4. पाणी बाटली पारदर्शी 5. सॅनिटायझर बॉटल 50 ml

सेंटरवर हे मिळेल

1. तीन लेअर मास्क 2. 1 Gloves 3. 1 पेन

(या वस्तू मिळत असल्या तरीही वरील बाबी स्वतः ही बाळगाव्यात.)

कोविडविषयी सर्व सूचना नीट पाळा

एका वर्गात केवळ 12 विद्यार्थी बसविण्याची तयारी सुरू असल्याने काही प्रमाणावर सेंटर वाढविले जातील.

NTA ने विद्यार्थ्यांना एसएमएस आणि ई-मेल पाठवलेले आहेतच. कदाचित काहींना एसएमएस किंवा ईमेल मिळणार नाही. त्यावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी खबरदारी म्हणून केंद्रावर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आपले सेंटर NTA च्या वेबसाईटवर तपासून घ्यावे.

वेळेचे नियोजन

दुपारी 2 ते 5 पेपर आहे. 1:30 वाजता शेवटची हॉल एन्ट्री आहे. सकाळी 11 पासून केंद्रावर तपासणी आणि Sanitize केले जाईल.

ड्रेस कोड असा ठेवला तर उत्तम

लांब बाह्यांचा शर्ट नको. मोठ्या बटन्स नकोत. जोडे घालून जाऊ नये. चप्पल वापरावी.

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने वरील उपाययोजना केलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी देखील वरील खबरदारी घ्यायला हवी. त्याबरोबरच केंद्रावर येताना आणि घरी जाताना देखील आपण कोरोना बाधितांच्या संपर्कात येणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Embed widget