एक्स्प्लोर

नीलगाय रनवेवर, फैजाबादमधून उड्डाणावेळी ठाकरे कुटुंब थोडक्यात बचावले!

विमानाच्या यशस्वी उड्डाणामुळे संकट टळले असले, तरी धावपट्टीवर अचानक नीलगाय कशी आली याची चौकशी होण्याची शक्यता आहे.

लखनौ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी आपला दोन दिवसाचा अयोध्या दौरा आटोपून मुंबईकडे निघाले. यावेळी अयोध्या (फैजाबाद) विमानतळावरून त्यांच्या विमानच्या उड्डाणावेळी धावपट्टीवर अचानक नीलगाय आली, मात्र कोणत्याही अडथळ्याशिवाय विमानाने यशस्वी उड्डाण केलं. उड्डाणावेळी नीलगाय धावपट्टीवर आल्यामुळे होणाऱ्या संभाव्य अपघातातून सुदैवाने ठाकरे कुटुंब बचावलं. या घटनेची दृश्य त्याठिकाणी उपस्थित असलेल्या मीडिया प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. यावेळी विमानात उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील आहेत. विमानाच्या यशस्वी उड्डाणामुळे संकट टळले असले, तरी धावपट्टीवर अचानक नीलगाय कशी आली याची चौकशी होण्याची शक्यता आहे. पाहा व्हिडीओ :   अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईत अयोध्या दौऱ्यावरुन परतलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं मुंबईत आगमन झालं आहे. आज दुपारी 4 वाजता मुंबईत विशेष विमानाने उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय दाखल झाले. शनिवारी दुपारी मुंबईतून अयोध्या दौऱ्यासाठी फैजाबादकडे रवाना झाले होते. उद्धव ठाकरे मुंबईत दाखल झाले त्यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मंत्री दिवाकर रावते, खासदार विनायक राऊत मुंबई विमानतळावर उपस्थित होते. मुंबईत आल्यानंतर लगेच उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह मातोश्रीकडे रवाना झाले. अयोध्येतून निघण्याआधी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राम मंदिर नाही तर आता सरकारही नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अयोध्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्येत पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी प्रथम पोलीस प्रशासन, यूपी सरकार आणि उत्तर प्रदेशच्या नागरिकांचे आभार मानले. "सर्व काही कोर्टाच्याच हातात आहे, तर मग निवडणुकीत राम मंदिराचं आश्वासन का दिलं जातं?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. "निवडणुकांआधी सगळे राम-राम करतात, निवडणुकीनंतर आराम करतात," असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget