एक्स्प्लोर
रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज दाखल

नवी दिल्ली: भाजपप्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. प्रचंड शक्तीप्रदर्शनाद्वारे भाजपकडून त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राजू शेट्टींसह भाजपच्या मित्रपक्षांचे नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
मात्र यावेळी प्रकर्शाने जाणवणारी बाब म्हणजे शिवसेनेची अनुपस्थिती होय. या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र शिवसेनेकडून कोणीही उपस्थित नव्हतं.
कोविंद फॉर्म भरतेवेळी शिवसेना सोडून एनडीएचे सगळे घटक पक्ष उपस्थित होते. मात्र कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेकडून अनंत गीते, संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ या तिघांच्या सह्या आहेत.
कोण आहेत रामनाथ कोविंद?
- रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी जन्म.
- कानपूर विद्यापीठातून एलएलबीची पदवी
- 1977 ते 1979 मध्ये दिल्लीच्या हायकोर्टात वकिली.
- 1994 आणि 2000 साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर नियुक्ती
- भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहिलं
- भाजप दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष
- 8 ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याबाबतच्या 10 खास गोष्टी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
