एक्स्प्लोर

धक्कादायक! 2020 मध्ये शेतकऱ्यांच्या नव्हे तर व्यापाऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या

NCRB data on suicide 2020 : 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये उद्योजकांच्या आत्महत्यांमध्ये २९ टक्क्यांनी वाढ झालीय. तर व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये जवळजवळ 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली:  देशात दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करतात. पण कोरोना काळात शेतकऱ्यांपेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एनसीआरबीच्या अहवालात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार 2020 मध्ये 11 हजार 716 व्यापारी आणि उद्योजकांनी आत्महत्या केली. तर या काळात 10 हजार 677 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कोरोना महासाथीच्या काळात निर्माण झालेल्या आर्थिक अरिष्टामुळे व्यापाऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे म्हटले जात आहे.

2019 च्या तुलनेत 2020 मध्ये उद्योजकांच्या आत्महत्यांमध्ये २९ टक्क्यांनी वाढ झालीय. तर व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये जवळजवळ 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना काळात व्यापाऱ्यांभोवतीही आर्थिक संकटाचा फास आवळला गेल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, वर्ष 2020 मध्ये 11,716 व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर, याच कालावधीत एकूण 10,677 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. आत्महत्या केलेल्या 11,716 व्यावसायिकांमध्ये 4356 व्यापारी आहेत. तर, 4226 प्रकरणे ही वेंडर्सची आहेत. तर, उर्वरित प्रकरणे अन्य व्यावसायिकांशी निगडित आहेत.

एनसीआरबीने या तीन श्रेणीतच व्यावसायिक समुदायांशी निगडित असल्याचे अधोरेखित केले. वर्ष 2019 च्या तुलनेत व्यावासायिक समुदायामध्ये 2020 मध्ये आत्महत्यांच्या प्रकरणात 29 टक्क्यांची वाढ दिसून आली. व्यापाऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात 2019 च्या तुलनेत (2906) वर्ष 2020 मध्ये (4356) 49.9 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. देशभरात एकूण आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये आत्महत्येच्या प्रकरणात 10 टक्क्यांची वाढ दिसून आली. मागील वर्षभरात देशभरात 1,53,052 जणांच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली.

कोरोना काळात अनेक लहान व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव नसणे यांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू होत्या. मात्र, कोरोना काळात लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. व्यावसायिकही मोठ्या दबावात असल्याचे 'फेडरेशन ऑफ इंडियन माइक्रो स्मॉल और मीडियम एंटरप्राइज'चे सचिव अनिल भारद्वाज यांनी म्हटले. कोरोना महासाथीच्या आजारामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
Embed widget