Naxal violence : गेल्या 12 वर्षात नक्षलवादी हिंसाचारात 77 टक्क्यांची घट, सरकारची लोकसभेत माहिती
Naxal violence : केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी हिंसाचारामध्ये गेल्या 12 वर्षात 77 टक्क्यांची घट झाली आहे.
Naxal Violence : गेल्या 12 वर्षांमध्ये भारतातील नक्षलवादी हिंसाचारात (Naxal violence ) तब्बल 77 टक्क्यांची घट झाली आहे. शिवाय नक्षली हिंसाचारात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील गेल्या 12 वर्षाच्या कालावधीत 90 टक्क्यांनी घटली आहे. एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Union Minister of State for Home Nityanand Rai) यांनी मंगळवारी याबाबतची माहिती लोकसभेत दिली आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी हिंसाचारामध्ये गेल्या 12 वर्षात लक्षणीयरीत्या घट झाली आहे. 2010 मध्ये देशात 1005 नक्षली हिंसाचाराच्या घटनांची नोंद झाली होती. तर 2022 मधील आकडेवारीनुसार देशातील 45 जिल्ह्यांतील फक्त 176 पोलिस ठाण्यांमध्ये संबंधित हिंसाचाराची नोंद झाली आहे. नक्षलवादामध्ये घट होण्यासाठी सरकारकडून सुरक्षा संबंधित (SRE) योजना राबली होती. या योजनेमुळे नक्षलवादी हिंसाचारात घट झाली आहे. 2010 मध्ये देशातील 126 जिल्हे SRE योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे झारखंडमधील सुरक्षेची स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली आहे. झारखंडमधील नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांची संख्या 2009 मध्ये 742 होती. ही संख्या 2022 मध्ये 132 पर्यंत खाली आली. म्हणजे या घटनांमध्ये 82 टक्क्यांची घट झाली.
Naxal violence in India fell 77 pc over past 12 years, number of deaths in related incidents also declined 90 pc during same period: Govt tells Lok Sabha
— Press Trust of India (@PTI_News) March 14, 2023
बुर्हा पहार, पश्चिम सिंगभूमचे ट्राय जंक्शन, सरायकेला-खरसावन, खुंटी आणि पारसनाथ टेकड्यांसारखी ठिकाणे नक्षलवादी हिंसाचारातून मुक्त करण्यात आली आहेत. या भागात माओवाद्यांनी छावण्या उभारल्या होत्या. परंतु, सुरक्षा दलांनी वेळोवेळी कारवाया करत त्यांचे प्रयत्न हाणून पाडले, अशी माहिती केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
Gadchiroli police : गडचिरोली पोलिसांना मोठे यश; जहाल नक्षलवाद्याला ठोकल्या बेड्या