एक्स्प्लोर

Gadchiroli police : गडचिरोली पोलिसांना मोठे यश; जहाल नक्षलवाद्याला ठोकल्या बेड्या

Gadchiroli News Update : गडचिरोली पोलिसांनी एका जहाल नक्षलवाद्याला  ( naxalite) अटक केली आहे. गडचिरोली पोलिसांची आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.

Gadchiroli News Update : गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli police) उत्तम कामगिरी करत एका जहाल नक्षलवाद्याला ( naxalite) अटक केली आहे. अटक करण्यात आलेला नक्षलवादी हा छत्तीसगडचा रहिवासीअसून वेल्ला केसे वेलादी ( वय, 35 ) त्याचे नाव आहे. गडचिरोली पोलिसांनी दामरंच्या जंगल परिसरात विशेष अभियान राबवून ही कारवाई केली आहे.  2001 मध्ये तो नक्षल दलममध्ये भरती झाल्यानंतर त्याने अनेक नक्षल कारवायात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. पोलिसांनी या नक्षलवाद्याला न्यायालयापुढे हजर केले असून त्याला 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जानेवारी 2022 पासून आजवर गडचिरोली पोलिसांनी एकूण 65 नक्षलवाद्यांना अटक केली आहे.

फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान नक्षलवादी देशभर टीसीओसी मोहीम राबवितात. यादरम्यान ते पोलीस दलावर हल्ले आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करतात. मात्र याच कालावधीत गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी गडचिरोली पोलिसांना बेल्ला केसे वेलादी याच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी दामरंच्या जंगलात विषेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यानच वेलादी पोलिसांच्या तावडीत सापडला. 

अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग

गडचिरोली पोलिसांनी अटक केलेला जहाल नक्षलवादी वेलादी याने आजपर्यंत अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग घेतला आहे. जनमीलिशिया सदस्य, संड्रा दलम सदस्य अशा विविध पदावर असताना वेल्ला याने अनेक हिंसक कारवाया पार पाडल्या. जाळपोळ, खून, चकमक, दरोडा अशा विविध गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. टेकामेटा चकमकीदरम्यान त्याने जहाल नक्षल नेता भास्कर याला पळून जाण्यास देखील मदत केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून तो पोलिसांच्या रडारवर होता. अखेर आज पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. 

आठवड्यात दुसरी मोठी कारवाई 

दरम्यान, गडचिरोली पोलिसांनी 20 फेब्रुवारी रोजीच  हैदराबाद येथून दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या दोन नक्षलवाद्यांमध्ये एक महिला आणि एका पुरुषांचा समावेश आहे. 2006 पासून हे दोन्ही नक्षलवादी फरार होते. त्या दोघांवरही शासनाने दहा लाख रूपयांचे बक्षीस ठेवले होते. टुगे उर्फ मधुकर चिन्हना कोडापे ( वय 42 जि. गडचिरोली ) आणि श्यामला उर्फ जामणी मंगलु पूनम ( वय 35 छत्तीसगड ) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही नक्षलवाद्यांची नावं आहेत. या कारवाईला आठ दिवस होण्याआधीच पोलिसांनी आज जहाल नक्षलवाद्याला अटक केली आहे.   

महत्वाच्या बातम्या

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, दोन जहाल नक्षलवाद्यांना ठोकल्या बेड्या  

महत्त्वाच्या बातम्या

Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget