एक्स्प्लोर

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर, मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवावर संध्याकाळी 5 वाजता होणार अंत्यंसस्कार

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याची माहिती सायंकाळी 7 वाजता गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती. अखेर त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

नवी दिल्ली : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी रात्री स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झालं. पर्रिकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे आज दिल्लीसह इतर सर्व राज्यातील राजधानीमध्ये तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. तर गोव्यात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मनोहर पर्रिकरांचा अखेरचा प्रवास - सकाळी 9.30 ते 10.30 - मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पणजी येथील भाजप कार्यालयात ठेवण्यात येईल. - सकाळी 10.30 वाजता पर्रिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कला अकादमी येथे हलविले जाईल. - 11 ते 4 वाजेपर्यंत : सामान्य लोकासांठी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. - दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कारासाठी मीरामार येथे पर्रिकर यांचे पार्थिव हलविले जाईल. - 4.30 वाजता : अंतिम विधी सुरु होईल. - सायंकाळी 5 वाजता पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील. गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय - संपूर्ण नाव : मनोहर गोपाळकृष्ण पर्रिकर. - गोव्यातल्या म्हापसामध्ये जन्म 13 डिसेंबर 1955 रोजी जन्म. - लोलोला हाय स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण. - मुंबईतील आयआयटीमधून मेटलर्जीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण. - (पर्रिकर भारतातले पहिले आयआयटीयन जे आमदार झाले आणि परिले आयआयटीयन जे एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री झाले). - विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत. - 1994 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. - 2001 मध्ये त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले. - त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये (2001) ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांचं सरकार केवळ दीड वर्ष टिकले. - जून 2002 मध्ये पर्रिकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. - 2000-2005, 2012-2014 आणि 2017-2019 गोव्याचे मुख्यमंत्री राहिले. - पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा पर्रिकरांनी सुचवलं. - 2014 मध्ये भाजपने देशात सत्ता मिळवली. पर्रिकरांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतली. - पर्रिकर संरक्षणमंत्री असताना उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. - गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी 2017 मध्ये पर्रिकरांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. - 13 मार्च 2017 मध्ये पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. - 2018 मध्ये पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे उघड झाले. संबंधित बातम्या लढवय्या नेता हरपला, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय   'सर्जिकल स्ट्राईक' ते 'वन रॅन्क वन पेन्शन योजना', संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकरांनी घेतलेले मोठे निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने शोककळा, लढवय्या नेत्याला मान्यवरांकडून श्रद्धांजली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!NEET Exam Scam : 'माझा'च्या प्रतिनिधीला 'नीट'चा आरोपी गंगाधरक़डून धमकावण्याचा प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Ahmednagar MLA List : विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी
Ahmednagar MLA List : विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी
Embed widget