एक्स्प्लोर

National Mathematics Day : आज गणित दिन... का साजरा केला जातो हा दिवस, काय आहे महत्व...

National Mathematics Day 2021  :आजच्याच दिवशी महान गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा जन्म झाला होता. जगभरात हा दिवस 'गणित दिन' म्हणून साजरा केला जातो.

National Mathematics Day 2021  : National Mathematics Day अर्थात राष्ट्रीय गणित दिन हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी महान गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा जन्म झाला होता. जगभरात हा दिवस 'गणित दिन' म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांनी फक्त फक्त गणितालाच वेगळी ओळख दिली नाही, तर त्यांनी अशी काही प्रमेय आणि सूत्र दिली ज्यांचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि जे बरेच फायद्याचे ठरतात.

दरवर्षी 22 डिसेंबरला देश रामानुजन यांच्या योगदानाची आठवण काढतो. त्यांनी फार कमी वेळातच फ्रॅक्शन, इनफायनाइट सीरिज, नंबर थिअरी, गणिती विश्लेषण या साऱ्याची सर्वांनाच माहिती दिली. गणित क्षेत्रात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि महावीर यांच्यासह रामानुजन यांचंही नाव घेतलं जातं.

का साजरा केला जातो हा दिवस ?

गणिताप्रती सर्वांनाच अभिरुची वाढावी यासाठी हा दिवस इतक्या मोठ्या पातळीवर साजरा केला जातो. अतिशय झपाट्यानं नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी झोकून देणाऱ्या नव्या पिढीचा गणिताकडे कल वाढवणं हा त्यामागचा मुख्य हेतू.
  
रामानुजन यांच्या जीवनप्रवासावर दृष्टीक्षेप

श्रीनिवास अयंगर रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये कोईंबतूरच्या ईरोड गावात झाला होता. ते एका ब्राह्मण कुटुंबात जन्मले होते. देश आणि जगातील काही महत्त्वपूर्ण गणिततज्ज्ञांमध्ये त्यांचं नाव गणलं जातं. असं म्हटलं जातं की, त्यांना बालपणापासूनच गणिताची आवड होती. भारत सरकारनं त्यांच्या जीवनकार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला.

वयाच्या 32 व्या वर्षी रामानुजन यांचं निधन

वयाच्या 32 व्या वर्षी रामानुजन यांचं निधन झालं. 2015 मध्ये त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा 'The Man Who Knew Infinity' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग साकारण्यात आले होते. 1976 मध्ये ट्रिनिटी कॉलेजच्या पुस्तकालयात एक जुनं रजिस्टर मिळालं होतं. ज्यामध्ये अनेक प्रमेय आणि सूत्र लिहिण्यात आली आहेत. या प्रमेयांना अद्याप कोणीही सोडवू शकलं नाहीत. हे रजिस्टर 'रामानुजन नोट बुक' या नावेही ओळखलं जातं.
 
Koo App
ज्यांच्या गणितीय समीकरणांमुळे ब्रह्मांडातील अनेक रहस्ये उलगडली, असे भारतभूमीवर जन्मलेले महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची आज जयंती. गणिताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन आणि सर्वांना राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! - Chandrakant Patil (@ChDadaPatil) 22 Dec 2021
National Mathematics Day : आज गणित दिन... का साजरा केला जातो हा दिवस, काय आहे महत्व...

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Digital Arrest: 'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
Nitish Kumar: नितीशकुमारांवर संशयकल्लोळ? भाजप अजूनही मौनात, शेवटच्या क्षणी राजीनाम्याची योजना सुद्धा बदलली! जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे ढकलली
नितीशकुमारांवर संशयकल्लोळ? भाजप अजूनही मौनात, शेवटच्या क्षणी राजीनाम्याची योजना सुद्धा बदलली! जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे ढकलली
1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही; लेक अमित ठाकरेंवरील गुन्ह्याबाबत शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही; लेक अमित ठाकरेंवरील गुन्ह्याबाबत शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare  PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Digital Arrest: 'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
Nitish Kumar: नितीशकुमारांवर संशयकल्लोळ? भाजप अजूनही मौनात, शेवटच्या क्षणी राजीनाम्याची योजना सुद्धा बदलली! जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे ढकलली
नितीशकुमारांवर संशयकल्लोळ? भाजप अजूनही मौनात, शेवटच्या क्षणी राजीनाम्याची योजना सुद्धा बदलली! जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे ढकलली
1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही; लेक अमित ठाकरेंवरील गुन्ह्याबाबत शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही; लेक अमित ठाकरेंवरील गुन्ह्याबाबत शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
Saudi Arabia Bus Accident: सौदीत मक्काहून मदिनाला बसची डिझेल टँकरला धडक; हैदराबादमधील एकाच कुटुंबातील 18 जणांचा झोपेतच जळून कोळसा; अवघा एकजण जिवंत बचावला
सौदीत मक्काहून मदिनाला बसची डिझेल टँकरला धडक; हैदराबादमधील एकाच कुटुंबातील 18 जणांचा झोपेतच जळून कोळसा; अवघा एकजण जिवंत बचावला
शरद पवारांच्या नेत्याची पत्नी ऐनवेळी शिवसेनेत, तर भाजप समर्थकांना शिंदे गटातून उमेदवारी; बार्शीत असं फिरलं राजकारण
शरद पवारांच्या नेत्याची पत्नी ऐनवेळी शिवसेनेत, तर भाजप समर्थकांना शिंदे गटातून उमेदवारी; बार्शीत असं फिरलं राजकारण
Baramati Nagar Parishad Election: अखेर सस्पेन्स संपला! बारामती नगराध्यक्ष पदासाठी अजितदादांनी उमेदवारी देताच भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा; महाविकास आघाडीचं अजूनही ठरंना
अखेर सस्पेन्स संपला! बारामती नगराध्यक्ष पदासाठी अजितदादांनी उमेदवार देताच भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा; महाविकास आघाडीचं अजूनही ठरंना
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव, मोहम्मद शमीकडून रणजीत धमाका सुरुच, दुसऱ्या कसोटीसाठी बोलावणं येणार?
टीम इंडियाचा आफ्रिकेविरुद्ध पराभव, शमीकडून रणजीत धमाका सुरुच, दुसऱ्या कसोटीसाठी बोलावणं येणार?
Embed widget