एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

National Herald Case : 'सत्य झुकेगा नही'! राहुल गांधींच्या घरासमोर पोस्टर, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर एक पोस्टर लावले आहे. हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज ईडीसमोर (ED) आपला जबाब नोंदवणार आहेत. या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर एक पोस्टर लावले आहे. हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर 'सत्य झुकेगा नही'! असं लिहलं आहे.

काँग्रेसचा भाजपवर निशाणा 

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होण्याच्या आधी, काँग्रेसनं रविवारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर (भाजप) सूडाच्या राजकारणाचा आरोप केला. आज 'नॅशनल हेराल्ड-असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' डीलशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी ईडीसमोर हजर होणार आहेत. अशा परिस्थितीत पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि खासदार दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयावर निषेध मोर्चा काढून 'सत्याग्रह' करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. राज्यातील काँग्रेस नेतेही सोमवारी तपास यंत्रणेच्या कार्यालयांवर मोर्चा काढून 'सत्याग्रह' करणार आहेत.

National Herald Case : 'सत्य झुकेगा नही'! राहुल गांधींच्या घरासमोर पोस्टर, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

ईडीने पाठवलेले समन्स निराधार :  पी. चिदंबरम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मनी लाँड्रिंग प्रकरणी राहुल गांधींना ईडीने पाठवलेले समन्स 'निराधार' आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते केले जातील, असे चिदंबरम म्हणाले.

सोनिया गांधी हजर राहणार नाहीत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना यापूर्वी दोन जून रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. पण ते विदेश दौऱ्यावर असल्यामुळं त्यांनी ईडीकडं वेळ वाढवून मागितली होती. त्यानंतर ईडीनं त्यांना 13 जूनला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. दुसरीकडे, सोनिया गांधी यांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. कारण त्यांना कोरोनाची लागण झाली असून अद्याप त्या कोरोनामुक्त झाल्या नाहीत.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 90 At 9AM 26 November 2024 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या #abpमाझाSharad Pawar-Uddhav Thackeray : शरद पवार आणि उद्धव ठाकरे पराभूत उमेदवारांसोबत करणार चिंतनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 26 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 26 November 2024 माझं गाव, माझा जिल्हा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
Maharashtra Goverment: महायुती सरकारमध्ये कोण-कोण मंत्री होणार?; संभाव्य नावे आली समोर, राजकीय वर्तुळात उत्सुकता
महायुती सरकारमध्ये कोण-कोण मंत्री होणार?; संभाव्य नावे आली समोर, राजकीय वर्तुळात उत्सुकता
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Embed widget