(Source: ECI/ABP News/ABP Majha)
National Herald Case : सोनिया गांधी यांची तब्बल तीन तास चौकशी, सोमवारी पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता
सोनिया गांधींच्या चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे, तर दुसरीकडे ईडीनं सोनिया गांधींच्या चौकशीसाठी खास प्लान तयार केला आहे.
Sonia Gandhi Questioned : नॅशनल हेराल्डप्रकरणी सुरू असलेली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी चौकशी संपली. सोनिया गांधी यांची चौकशी तब्बल तीन तास सुरू होती. सोमवारी सोनिया गांधी यांना पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी चौकशीसाठी ईडीसमोर उपस्थित होत्या. तुम्हाला जे विचारायचे आहे ते तुम्ही विचारू शकता मी 8 वाजेपर्यंत बसण्यास तयार आहे. तसेच मी उद्या देखील येण्यास तयार आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या परंतु इडीकडे कोणतेही प्रश्न नव्हते.
कोरोनातून नुकत्याच बऱ्या झालेल्या सोनिया गांधी या चौकशीला आज हजर राहिल्या. त्यांनी मास्क लावले होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी त्यांच्याबरोबर होते. प्रियंका गांधी यांना ईडीच्या मुख्यालयात थांबण्यास परवानगी दिली. कारण सोनिया गांधी यांना वेळेवर औषधे देता येतील. प्रियंका गांधी यांना सोनिया गांधी यांच्या खोलीपासून दूर ठेवण्यात आले होते.
एकीकडे सोनिया गांधींच्या चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे, तर दुसरीकडे ईडीनं सोनिया गांधींच्या चौकशीसाठी खास प्लान तयार केला आहे. सोनिया गांधींची ईडीकडून तीन टप्प्यांमध्ये चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी ईडीच्या अतिरिक्त संचालक मोनिका शर्मा करणार आहेत.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची तीन टप्प्यात चौकशी केली जाईल. प्रश्नांच्या पहिल्या टप्प्यात, त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारले जातील ज्यांची संख्या 10 पर्यंत असू शकते. या प्रश्नांमध्ये ती आयकर विभागात कर भरता का? त्यांचा पॅन क्रमांक काय आहे? देशात त्यांची कुठे-कुठे मालमत्ता आहे? परदेशात मालमत्ता कुठे आहे? त्यांची किती बँक खाती आहेत? कोणत्या बँकेत खाती आहात?
दरम्यान, सोनिया गांधींना आलेल्या या समन्समुळे काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झालेय. या समन्सविरोधात राज्यभर आज काँग्रेसचं आंदोलन आहे. मुंबईतही आज काँग्रेस नेते ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नाशिक आणि पुण्यातही काँग्रेसची निदर्शनं करण्यात आली.