एक्स्प्लोर

National Herald Case : तुमची कोणकोणत्या बँकांमध्ये खाती? राहुल गांधींना ईडी विचारणार 'हे' 5 प्रश्न

National Herald Case : नॅशनल हेराल्डप्रकरणी चौकशीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. प्रियंका गांधींच्या नेतृत्वात पायी मोर्चा काढत दिल्लीत काँग्रेसनं शक्तीप्रदर्शन केलंय.

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) ईडीनं (ED) समन्स बजावल्यानंतर आज राहुल गांधी दिल्लीत ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. गेल्या तासभरापासून ईडीकडून राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) चौकशी सुरू आहे. ईडी कार्यालयाकडे रवाना होण्यापूर्वी काँग्रेसनं (Congress) दिल्लीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. दिल्ल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राहुल गांधी हे बहीण प्रियंका गांधींसह (Priyanka Gandhi Vadra) दिल्लीतील ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. यावेळी राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाले होते. रणदीप सुरजेवाला, दिग्विजय सिंह, अधिरंजन चौधरी हे सर्व नेते राहुल गांधींसह ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. 

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडी चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यावरस उतरत जोरदार घोषणाबाजी केली, तर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागली आहेत. अशातच राहुल गांधींच्या ईडी चौकशीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राहुल गांधींना ईडी चौकशीत कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागू शकतं, ही माहिती सुत्रांनी दिली आहे. आजच्या चौकशीत ईडीकडून अनेक गोष्टींचा खुलासा करण्याचा प्रयत्न असेल. जाणून घेऊया ईडी आजच्या चौकशीत कोणते प्रश्न विचारु शकते, त्याबाबत... 

राहुल गांधींना ईडी कोणते प्रश्न विचारु शकते? 

प्रश्न 1 : तुमची किती बँक खाती आहेत? 
प्रश्न 2 : कोणकोणत्या बँकांमध्ये तुमची खाती आहेत? 
प्रश्न 3 : परदेशातही तुमची बँक खाती आहेत? 
प्रश्न 4 : जर तुमची परदेशातही बँक खाती असतील, तर त्यांची माहिती द्या. 
प्रश्न 5 : तुमची संपत्ती कुठे-कुठे आहे? परदेशातही तुमची संपत्ती आहे? सविस्तर माहिती द्या

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना यापूर्वी दोन जून रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. पण ते विदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितली होती. त्यानंतर ईडीनं त्यांना 13 जूनला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. दुसरीकडे, सोनिया गांधी यांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. कारण त्यांना कोरोनाची लागण झाली असून अद्याप त्या कोरोनामुक्त झाल्या नाहीत. 

दरम्यान, सोनिया गांधी यांना गेल्या गुरुवारी कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल अद्याप निगेटिव्ह आलेला नाही. नॅशनल हेराल्ड प्रकरणात कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ईडीनं 13 जून रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ईडीनं यापूर्वी राहुल गांधींना 2 जून रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं. परंतु, त्यांनी देशाबाहेर असल्याचं सांगत हजर राहण्यासाठी दुसरी एखादी तारीख द्यावी, अशी विनंती केली होती. राहुल गांधी गेल्या आठवड्यात मायदेशी परतले.

नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? 

नॅशनल हेराल्ड' हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरू केलं होतं. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र, 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या 'यंग इंडिया' या कंपनीनं या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतलं. मात्र, हे सुरू करण्यात आलं नव्हतं. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. 

नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. पटियाला हाऊस न्यायालयानं राहुल आणि सोनिया यांना फसवणूक आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. यंग इंडियाने फक्त 50 लाख रुपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप सोनिया आणि राहुल यांच्यावर करण्यात आला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधी आज ईडीसमोर हजर राहणार; नेते-कार्यकर्त्यांना शक्तीप्रदर्शनाची परवानगी नाहीच

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget