National Disinfectant Day 2024 : मुलांमधील अशक्तपणा दूर करण्यासाठी 1-19 वयोगटातील मुलांना जंतनाशक औषध देण्याता डॉक्टरांचा सल्ला
National Disinfectant Day 2024 : 1-19 वयोगटातील मुलांमध्ये जंतनाशक हे त्यांच्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
National Disinfectant Day 2024 : लहान मुलांमध्ये जंत होणं ही फार सामान्य बाब आहे. मुलांमध्ये जंत कधी निर्माण होतात हे पटकन लक्षात येत नाही पण, त्याचे परिणाम मुलांच्या आरोग्यासाठी फार धोकादायक असतात. दिर्घकाळ मुलांच्या शरीरात जंत राहिल्यास त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मुलांना 6 ते 12 महिन्यातून एकदा जंतनाशक औषध देणं गरजेचं आहे. 1-19 वयोगटातील मुलांमध्ये जंतनाशक हे त्यांच्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
मुलांमध्ये जर जंताचा वारंवार त्रास निर्माण होत असेल तर त्यासाठी त्यांना जंतनाशक औषधं देऊन या संसर्गाचा प्रसार रोखता येतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 20% पेक्षा जास्त प्रादुर्भाव असलेल्या भागात वार्षिक जंतनाशक आणि 50% पेक्षा जास्त प्रसार असलेल्या भागात द्विवार्षिक जंतनाशकाची शिफारस केली जाते.
अस्वच्छतेमुळे मुलांच्या आतड्यात जंतांची वाढ होऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेनच्या (WHO) मते, भारतातील सुमारे 220 दशलक्ष मुलांना (1 ते 14 वर्षे) एसटीएच (STH) संसर्गाचा धोका आहे. महाराष्ट्रात याचे प्रमाण 20% - 50% इतके आहे. WHO नुसार, 870 दशलक्ष मुलांना परजीवी जंत संसर्गाचा धोका आहे. जंतनाशकामध्ये राउंड वर्म्स, फ्लूक्स आणि टेपवर्म्स सारख्या परजीवी नष्ट करण्यासाठी अँटीहेल्मिंथिक औषधांचा समावेश केला जातो. एस्केरिस लुम्ब्रिकोइड्स (राउंडवर्म), ट्रायच्युरिस ट्रायच्युरा (व्हीपवर्म), आणि अँसायलोस्टोमा ड्युओडेनेल किंवा नेकेटर अमेरिकनस (हुकवर्म्स) जे मानवांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारे परजीवी आहेत.
जंतांमुळे शरीरात रक्ताची कमतरता
आतड्यातील जंत हे मुलांमध्ये अशक्तपणाची वाढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरते. कारण यात मुलांच्या शरीरातून रक्त कमी होते. अशक्तपणामुळे मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. जंतांमुळे दीर्घकाळ रक्त कमी झाल्यामुळे लोहाची कमतरता निर्माण होते. लोह शरीरात मेंदूचे कार्य, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि स्नायूंचे कार्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. जंताने प्रभावित मुलांना थकवा,अशक्तपणा आणि एकाग्रता कमी होणे अशी लक्षणे आढळून येऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर परिणाम होतो. यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधांचे सेवन करणे गरजेचे आहे. सामान्यतः लिहून दिलेल्या औषधांमध्ये अल्बेंडाझोल किंवा मेबेन्डाझोल यांचा समावेश होतो, जे कृमींना ग्लुकोज शोषून घेण्यापासून रोखतात, ज्यामुळे त्यांची उर्जा कमी होते आणि त्या कृमी मृत पावत असल्याची माहिती डॉ. तुषार पारीख (मदरहूड हॉस्पिटल्स पुणे येथील वरिष्ठ सल्लागार बालरोगतज्ज्ञ आणि निओनॅटोलॉजिस्ट) म्हणाले.
यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) प्रतिबंधात्मक थेरपी वापरण्याचा सल्ला देते, विशेषत: जंतनाशक अल्बेंडाझोल (400 mg) किंवा मेबेंडाझोल (500 mg) चा वार्षिक किंवा द्विवार्षिक डोस प्रशासनाद्वारे दिला जातो. या हस्तक्षेपाची शिफारस 12-23 महिने वयोगटातील लहान मुले, 1-4 वर्षे वयोगटातील प्रीस्कूल मुले आणि 5-12 वर्षे वयोगटातील शालेय मुले (विशिष्ट भागात 14 वर्षांपर्यंत) ज्या प्रदेशात कोणत्याही मातीचा प्रादुर्भाव आहे अशा प्रदेशात राहणाऱ्यांसाठी केली जाते. मुलांमध्ये संक्रमित संसर्ग 20% किंवा त्याहून अधिक आहे. मातीतून पसरणाऱ्या हेल्मिंथ संसर्गाचे ओझे कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. 50% पेक्षा जास्त प्रभावित भागात, द्विवार्षिक डोस देण्यास प्राधान्य दिले जाते. 24 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी अल्बेंडाझोल (200 मिग्रॅ) च्या अर्ध्या डोसची शिफारस केली जाते. आम्ही 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी वर्षातून दोनदा डोस देण्याता सल्ला देतो जिथे एसटीएचचा प्रादुर्भाव अधिक असतो. त्यानंतर 5 ते 12-14 वयोगटातील मुलांना वार्षिक डोस दिला जातो असेही डॉ. तुषार पारीख यांनी स्पष्ट केले.
10 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा केला जातो. शाळा आणि अंगणवाडी सेविका अशा विविध माध्यमांद्वारे मोफत अल्बेंडाझोलचे वाटप करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.मुलांमध्ये जंतनाशक ही काळाची गरज आहे कारण जंतांमुळे मुलांच्या संपुर्ण आरोग्यावर परिणाम होत असतो. आतड्यांतील कृमी मुलाच्या पचनसंस्थेवर परिणाम करतात, ज्यामुळे कुपोषण आणि वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसून येतात. हे परजीवी अशक्तपणा आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात, ज्यामुळे मुले इतर आजारांना बळी पडतात. मुलांना जंतनाशक औषध देऊन आरोग्यासंबंधीत धोके लक्षणीयरीत्या कमी करता येऊ शकतात आणि त्यांचे संपूर्ण आरोग्य सुधारता येऊ शकते. आतड्यांतील जंतांमुळे शारीरीक कमकुवतपणा येऊ शकतो आणि आजारपणामुळे मुलांना शाळेत हजेरी लावणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलांमधील जंतनाशकाला प्राधान्य देणे हे त्यांच्या भविष्यातील विकासासाठी फायदेशीर ठरते असे डॉ पारीख यांनी स्पष्ट केले.