Nari Shakti : स्वातंत्र्यासाठी 'तिचं' लेखणीचं शस्त्र
Nari Shakti : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक महिलांनी लेखनीच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात उतरण्यासाठी प्रेरित केलं आहे. यात सरोजिनी नायडूंपासून ते हंसा मेहतांपर्यंत अनेक महिलांचा समावेश आहे.
Women Authors And Poets : प्रत्येक क्षेत्रात स्त्रीचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिलं आहे. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीदेखील स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग नोंदवला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक महिलांनी लेखणीच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात उतरण्यासाठी प्रेरित केलं आहे. यात सरोजिनी नायडूंपासून ते हंसा मेहतांपर्यंत अनेक महिलांचा समावेश आहे.
सरोजिनी नायडू
सरोजिनी नायडू या भारताच्या 'गानकोकिळा' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अनेक देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. त्यामुळे अनेक मंडळींना प्रेरणा मिळाली आहे. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत त्यांचं शिक्षण झालं आहे. सरोजिनी नायडू या स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकत्या होत्या. आपल्या लिखणीने आणि भाषणाने त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्री स्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला.
शांता शेळके
शांता शेळके एक प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या. तसेच त्या प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक आणि पत्रकारदेखील होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपन नावानेदेखील गीते लिहिली आहेत. स्वातंत्र्य लढ्या दरम्यान त्यांनी ललित लेख, काव्यसंग्रहाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं आहे.
उषा मेहता
उषा मेहता यांच्या आवाजाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढा घरा-घरांत पोहोचला. त्यांनी रेडिओ स्टेशनवरून बातम्या सांगायला सुरुवात केली. ब्रिटिश भारतीयांवर कसा अन्याय करतात हे त्यांनी रेडिओ आणि लेखनीने लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं काम मोलाचं आहे.
हंसा मेहता
हंसा मेहता यांनी इंग्लंडमध्ये पत्रकारिता आणि समाजशास्त्राचा अभ्यास केला आहे. समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्ता असण्यासोबत त्या शिक्षिका आणि लेखिकाही होत्या. गुजराती भाषेत अनेक पुस्तकं त्यांनी भाषांतरित केली आहेत. यात गलिव्हर, शेक्सपिअरचे हॅम्लेट, मर्चंट ऑफ व्हेनिस, वाल्मिकी रामायणाचा समावेश आहे. स्त्रियांना समान नागरिकत्व, समान शिक्षण व स्वास्थ्य, समान वाटणी, संपत्तीतील समान वाटा, वैवाहिक जीवनात समान अधिकार मिळावा यासाठी हंसा मेहता यांनी प्रयत्न केले आहेत.
कमला चौधरी
कमला चौधरी यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. घरातील साम्राज्यशाही विषयीच्या एकनिष्ठांपासून दूर जाऊन त्या राष्ट्रीय समितीमध्ये सामिल झाल्या. 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या 'सिव्हिक डीस- ओबिडियन्स' चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांचे उन्माद, पिकनिक, यात्रा, बेलपत्र सारखे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शेतकऱ्यांची पिळवणूक, विधवांची वाईट परिस्थिती अशा सामाजिक प्रश्नांना त्यांनी लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडली आहे.
अमृता प्रीतम
अमृता प्रीतम यांची गणना भारतातील महान साहित्यिकांमध्ये होते. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी काही साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. स्वातंत्र्य लढ्या दरम्यान त्यांनी कादंबऱ्या, आत्मचरित्र, कथासंग्रह, कवितासंग्रह, ललित गद्याच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलं आहे.
संबंधित बातम्या