एक्स्प्लोर

Vande Bharat: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न राहणार अपूर्ण? 15 ऑगस्टपर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणं अशक्य

Vande Bharat Express: भारतात 15 ऑगस्टपर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं होतं. मात्र मोदींचं हे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

Vande Bharat: देशातील 19वी वंदे भारत एक्सप्रेस मडगाव-मुंबई (Madgaon-Mumbai Vande Bharat) मार्गावर सुरू होणार आहे. मात्र तरीही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Modi) स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. कारण, 15 ऑगस्टपर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचं मोदींनी जाहीर केलं होतं. मात्र सध्याचा वंदे भारत ट्रेन बनवण्याचा वेग पाहता केवळ 10 ते 12 ट्रेनच ऑगस्टपर्यंत बनतील, त्यादेखील केवळ 8 डब्यांच्या, असं चित्र सध्या निर्णाण झालं आहे. त्यामुळे मोदींचं स्वप्न अपूर्ण राहण्याची दाट शक्यता आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2019 ला नवी दिल्ली स्थानकात हिरवा झेंडा दाखवून पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला लोकार्पित केलं आणि भारतीय रेल्वेचं नवं पर्व सुरू झालं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचं मोदींनी गेल्या वर्षी झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरून जाहीर केलं.

मात्र, नरेंद्र मोदींचं हे स्वप्न अपूर्ण राहण्याची दाट शक्यता आहे. याचं कारण देखील तसंच आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदींनी एका वर्षात 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचं आव्हान भारतीय रेल्वेला दिलं, त्यावेळी भारतीय रेल्वेकडे इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक रेल्वे निर्मिती करण्याची यंत्रणा उपलब्ध नव्हती. 

वंदे भारत एक्सप्रेस चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बनवण्यात येतात. सध्या तिथे उत्पादनाची पूर्ण क्षमता लावून 16 डब्यांच्या महिन्याला केवळ 4 वंदे भारत एक्सप्रेस बनवण्यात येत आहेत. अशा प्रकरच्या एकूण 18 वंदे भारत एक्सप्रेस आतापर्यंत बनवण्यात आल्या आहेत. जी 19वी वंदे भारत एक्सप्रेस मडगाव आणि मुंबईच्या दरम्यान धावेल, ती तर केवळ आठ डब्यांचीच आहे.

जुलै महिन्यात लातूर कोच फॅक्टरीमधून वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती सुरू करण्याचा प्लॅन आहे. मात्र तिथे देखील महिन्याला 4 ते 5 वंदे भारत एक्सप्रेस बनतील. त्यामुळे चेन्नई आयसीएफ येथील जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातल्या 8 ते 10 आणि लातूर कोच फॅक्टरी येथील जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील 8 ते 10 वंदे भारत एक्सप्रेस येत्या काळात बनून तयार होतील, मात्र त्यामुळे नरेंद्र मोदींचं टार्गेट पूर्ण होणार नाही. 

दुसरीकडे, याच वंदे भारत एक्सप्रेसचे दुसरे स्लीपर कोच असलेले व्हर्जन निर्माण करण्यासाठी रशियाच्या टीएमएच (TMH) आणि भारतातील रेल विकास निगम लिमिटेड या दोन कंपन्यांच्या जॉईंट व्हेंचरला कंत्राट देण्यात आलं होतं. तब्बल 30 हजार कोटींपेक्षा जास्तीच्या या कंत्राटात 120 स्लीपर क्लास वंदे भारत एक्सप्रेस बनवण्यात येणार होत्या. मात्र, रशिया आणि युक्रेन देशातील युद्धामुळे जगाने रशियावर टाकलेल्या वेगवेगळ्या निर्बंधांमुळे ही योजना देखील संकटात सापडली आहे. 

वंदे भारत एक्सप्रेस या खरं तर 16 डब्यांच्या बनवण्याचा प्लॅन होता. मात्र टार्गेट पूर्ण होत नाही हे लक्षात येताच आता 8 डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेस बनवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कमी डब्यांच्या एक्सप्रेसमुळे प्रवासी वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

सध्या भारतीय रेल्वेमध्ये राजधानी एक्सप्रेसपेक्षा जास्त प्रायोरिटी ही वंदे भारत एक्सप्रेसला देण्यात येत आहे. त्यासाठी इतर गाड्यांचे वेळापत्रक देखील अनेक वेळा बदलण्यात आले आहे. मात्र ज्या ठिकाणी गरज नाही अशा ठिकाणी देखील वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा अट्टाहास का केला जातोय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

Vande Bharat Express: मुंबई-गोवा प्रवास आता हायस्पीड; कोकण मार्गावर 5 जूनपासून धावणार 'वंदे भारत' ट्रेन

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget