एक्स्प्लोर

जातीनिहाय आरक्षणाला धक्का लावणार नाही- नरेंद्र मोदी

एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी एआरसी, आरक्षण आणि मॉब लिंचिंग सारख्या विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सध्याच्या सर्वात वादग्रस्त विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी एनआरसी, आरक्षण आणि मॉब लिंचिंगसारख्या विविध विषयांवर आपलं मत मांडलं. एनआरसीच्या विषयावर बोलताना मोदी म्हणाले की, कोणत्याही भारतीय नागरिकाला देश सोडावा लागणार नाही.

आरक्षणाच्या विषयावर बोलताना मोदी म्हणाले की, जातीनिहाय आरक्षण बदलण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही. तसेच भाजपला पराभूत करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली महाआघाडी फार काळ टिकणार नाही. याशिवाय आमच्या सरकारने गेल्यावर्षी आमच्या देशातील एक कोटी युवकांना रोजगार दिल्याचा दावाही यावेळी मोदींनी केला. नरेंद्र मोदींची मुलाखत 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.

जातीनिहाय आरक्षणाला धक्का लावणार नाही देशात आरक्षणाचा मुद्दा सध्या तापलेला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी लोग रस्त्यावर उतरले आहे. महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मोदी म्हणाले की, आरक्षणात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. याबाबत कोणालाही शंका घेण्याची गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्ने देशाची ताकद आहे आणि आम्ही ती पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहोत. सबका साथ, सबका विकास हा आमचा उद्देश आहे. गरीब, पीडित, दलित, मागास, आदिवासी आणि ओबीसी समाजातील लोकांचं हित जपणं गरजेचं आहे.

एनआरसीवर काय बोलले मोदी? कोणत्याही भारतीय नागरिकाला देश सोडावा लागणार नाही. ज्या नागरिकांची नावं यादीत नाहीत, त्यांना त्यांचं नागरिकत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली जाईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एनआरसीच्या मुद्यावर मोदींवर सातत्यानं हल्लाबोल करत आहेत. मोदींनी यावेळी ममता बॅनर्जी यांना उत्तर देत म्हटलं की, ज्या लोकांचा स्वत:वरचा विश्वास उडला आहे, ज्यांना देशातील नागरिकांच समर्थन नाही, जे देशातील महत्त्वाच्या संस्थांवर विश्वास ठेवत नाहीत, तेच लोक देशाचे तुकडे करण्याच्या गोष्टी करतात.

एक कोटी तरुणांना रोजगार दिले देशात बेरोजगारी मोठी समस्या आहे. विरोधी पक्ष याच विषयावर मोदी सरकारवर वारंवार टीका करत आहे. या विषयावर बोलताना मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी एक कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामुळे रोजगार उपलब्ध झाले नाही हे बोलणं आता बंद करायला हवं. याशिवाय विविध केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत या योजनांद्वारे रोजगार उपलब्ध झाले नाही का? असा सवाल मोदींनी उपस्थित केला.

मॉब लिंचिंगच्या घटना दुर्दैवी जमावाकडून होणाऱ्या हत्यांच्या मुद्द्यावरही मोदींनी मौन सोडलं आहे. अशा घटना दु्र्दैवी आहेत. सर्वांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजात शांतता आणि एकता निर्माण करायला हवी. अशा घटनानांवर आणि अशा मानसिकतेवर आम्ही अनेकदा स्पष्ट शब्दात आमची भूमिका मांडली आहे. त्यामुळे अशा घटनांचं समर्थन होऊ शकत नाही.

महाआघाडी फार काळ टिकणार नाही भाजपला पराभूत करण्यासाठी एक आलेल्या विरोधकांनी महाआघाडीची स्थापना केली आहे. यावरुन मोदींनी हल्लाबोल केला. ही महाआघाडी फार काळ टिकणार नाही. फक्त ही महाआघाडी निवडणुकी आधी तुटते की निवडणुकीनंतर हे पाहावं लागणार आहे. महाआघाडी वैचारिक समर्थन, जनतेच्या अपेक्षा, विकास, वैचारिक एकतेसाठी नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी या महाआघाडीची स्थापना करण्यात आली आहे. भाजपच्या लोकप्रियतेबाबत विरोधीपक्ष चिंतीत आहे. त्यामुळे एकट्याने लढण्याची हिंमत विरोधकांमध्ये राहिली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget