एक्स्प्लोर
माणसांचा जीव घेणं ही गोरक्षा नाही, मोदी भावुक
अहमदाबाद : कथित गोरक्षकांचा देशभर सुरु असेलल्या धुमाकूळानंतर पहिल्यांदाच मोदींनी आपलं मौन सोडलं आहे. गोरक्षेच्या नावावर देशात होत असलेल्या हिंसेमुळे अतिशय दु:ख होत असल्याचं सांगत नरेंद्र मोदी भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
या गोरक्षकांनी महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या आयुष्यातून बोध घ्यायला हवा, असा सल्लाही मोदींनी दिला.
गुजरातमधील साबरमती आश्रमाच्या 100 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी म्हणाले की, एखाद्या माणसाचा जीव घेणं ही गोरक्षा आहे का? विनोबा भावे यांच्यापेक्षा मोठा गोरक्षक अद्याप झालेला नाही. देशाला अहिंसेच्या मार्गावरच चालावं लागेल, कारण हेच आपले मूलभूत संस्कार आहेत. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही.
'गोरक्षेच्या नावावर लोकांचा जीव घेणं, हे सहन केलं जाणार नाही. महत्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्यापेक्षा जास्त गोरक्षा कोणीही केली नाही. महत्मा गांधी आज असते, तर याला त्यांनी विरोध केला असता. महात्मा गांधींचा हा मार्ग असूच शकत नाही. विनोबा यांचा हा संदेश नाही.
ही भूमी अहिसेंची आहे, महात्मा गांधीजींची आहे. ही गोष्ट आपण का विसरतो? जर कोणी चुकीची काम केलं कर कायदा त्याविरोधात कारवाई करणार. देशात कोणलाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. हिंसा कोणत्याही गोष्टीचं उत्तर असू शकत नाही.
देशाच्या विविध भागात काही दिवसांपासून कथित गोरक्षकांनी लोकांना मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. यात काही जणांचा मृत्यूही झाला होता. या घटनांवरुन विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement