एक्स्प्लोर
Advertisement
'दोन्ही पंतप्रधानांनी पायउतार व्हावं' निवेदकाच्या घोळाने हास्यकल्लोळ
नवी दिल्ली : बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर आहेत. एका कार्यकर्मादरम्यान निवेदकाने अनवधानाने पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांना पायउतार होण्याबाबत दिलेल्या सूचनेमुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला.
नवी दिल्लीतील कार्यक्रमात दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी निवेदकाने दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना उद्देशून 'आय रिक्वेस्ट यू टू स्टेप डाऊन' असं म्हटलं. स्टेप डाऊन अर्थातच 'पदावरुन पायउतार' होण्याच्या सूचनेमुळे शेख हसीना आणि मोदी या दोघांनाही हसू अनावर झालं.
फक्त मोदी आणि शेख हसीनाच नाही, तर निवेदकाच्या सूचनेनंतर सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. मात्र त्यानंतर प्रसंगाचं भान राखत निवेदकाने पुढील कार्यक्रम सुरु ठेवला.
पाहा व्हिडिओ :
https://twitter.com/ANI_news/status/850620350358577154
दोन्ही देशांमध्ये 22 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यामध्ये आण्विक सहकार्य करारासह विविध करारांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांनी विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. मोदींनी बांग्लादेशला विविध योजनांसाठी 4.5 अब्ज डॉलर्सचं (भारतीय चलनानुसार साडे 29 हजार कोटी) कर्ज देण्याची घोषणा केली.
संबंधित बातम्या :
भारत बांग्लादेशला 29 हजार 500 कोटींचं कर्ज देणार
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 4 दिवसीय भारत दौऱ्यावर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
क्राईम
Advertisement