एक्स्प्लोर

राज्यसभेवर भाजपकडून जावडेकर-राणेंसोबत एकनाथ खडसे?

महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ खडसेंना दिल्लीत पाठवण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर नारायण राणे यांनी राज्यसभेची ऑफर स्वीकारली आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ खडसेंना दिल्लीत पाठवण्याच्या हालचाली सुरु आहेत. राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर आणि नारायण राणे यांच्यासोबत खडसेंचं नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे. राणेंनी राज्यसभेची ऑफर स्वीकारली असून खडसेंचं नाव निश्चित होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत. विधानसभेचे संख्याबळ पाहता, तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे या तीन जागांवर महाराष्ट्रातून भाजप कुणाला राज्यसभेवर पाठवतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. प्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असून, ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते होम ग्राऊंडवरुन म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करुन एनडीएत सहभाग घेतला. मात्र राज्यातील मंत्रिपदाच्या आशेवर असणाऱे राणे आता राज्यसभेच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत. राज्यसभेची ऑफर राणेंनी विचार करुन स्वीकारल्याची माहिती आहे. एकनाथ खडसे आरोपांच्या जंजाळात अडकल्यापासून मंत्रिमंडळापासून दूर आहेत. त्यामुळे भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याचं एकप्रकारे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून होताना दिसत आहे. 16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. 23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार वंदना हेमंत चव्हाण  - राष्ट्रवादी डी. पी. त्रिपाठी  - राष्ट्रवादी रजनी पाटील  - काँग्रेस अनिल देसाई  - शिवसेना राजीव शुक्ला - काँग्रेस अजयकुमार संचेती - भाजप केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचा कार्यकाळ संपणार आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्‍ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. कोणत्या पक्षाचे किती खासदार निवृत्त? भाजप -17 काँग्रेस - 12 समाजवादी पक्ष - 6 जदयू - 3 तृणमूल कॉंग्रेस - 3 तेलुगू देसम पक्ष - 2 राष्ट्रवादी कॉंग्रेस - 2 बीजद - 2 बसप - 1 शिवसेना - 1 माकप - 1 अपक्ष  - 1 राष्ट्रपती नियुक्‍त - 3 संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. कोणत्या राज्यातील किती जागा? आंध्र प्रदेश - 3 बिहार - 6 छत्तीसगड - 1 गुजरात - 4 हरियाणा - 1 हिमाचल प्रदेश - 1 कर्नाटक - 4 मध्य प्रदेश - 5 महाराष्ट्र - 6 तेलंगणा - 3 उत्तर प्रदेश - 10 उत्तराखंड - 1 पश्चिम बंगाल - 5 ओदिशा - 3 राजस्थान - 3 झारखंड - 2 याशिवाय केरळातील खासदार वीरेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्या जागेसाठीही पोटनिवडणूक होईल. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं राज्यसभेत सर्वाधिक संख्याबळ आहे.

संबंधित बातम्या

राज्यसभेसाठी भाजपची महाराष्ट्रातून राणेंसह 3 नावं निश्चित : सूत्र

राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला निवडणूक

राज्यसभा निवडणूक : शिवसेनेकडून अनिल देसाईंना पुन्हा संधी

जया बच्चन पुन्हा समाजवादी पक्षाकडून राज्यसभा उमेदवार

जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget