Nagaland : नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? आज शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय होणार
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्या आहेत. सात जागांसह राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. त्यामुळं नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Nagaland : नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी (BJP-NDPP) आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षानं नागालँडमध्ये (Nagaland) सरकार स्थापन केलं आहे. निफियू रिओ (Neiphiu Rio) हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्या आहेत. सात जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळं नागालँडमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा देखील सुरु आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.
नागालँडमध्ये राष्ट्रवादीनं सत्तेत जायचा निर्णय घेतल्यास सर्वच पक्ष सरकारमध्ये सामील होतील. इतर छोट्या पक्षांनीही एनडीपीपी-भाजप प्रणित सरकारला पाठिंबा जाहीर करुन टाकला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा कल सत्तेत सहभागी होण्याकडे आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती नागालँडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी एबीपी माझाला दिली आहे. दरम्यान आज (8 मार्च) सकाळी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
BJP-NDPP : एनडीपीपीनं 25 तर भाजपनं 12 जागा जिंकल्या
नागालँडमध्ये एनडीपी आणि भाजप समर्थित आघाडीला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळं सत्ता स्थापनेसाठी त्यांना कोणात्या इतर पक्षांची गरज भासली नाही. पण तरी राज्याचा पूर्व इतिहास बघता सगळेच पक्ष सत्तेत सहभागी व्हायला निघाले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्याच मार्गानं जाणार का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपीचं सरकार स्थापन होणार आहे. निफियू रिओ पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजपनं 60-सदस्यीय राज्य विधानसभेसाठी 40-20 जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासह निवडणूक लढवली आणि सलग दुसऱ्यांदा सत्तेत परतले. एनडीपीपीनं 25 तर भाजपनं 12 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं सात, एनपीपीनं पाच आणि नगा पीपल्स फ्रंट, लोजप (रामविलास) आणि आरपीआय (आठवले) प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहे. त्याचबरोबर जेडीयूनं एक जागा जिंकली आहे, तर चार अपक्षांनीही विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: