पंतप्रधानांच्या 'मास्क लावा' या आवाहनास हरताळ, अमित शाहांच्या जनविश्वास यात्रेत कोरोना नियमांची पायमल्ली
नेतेमंडळीच निर्बंध लावतात आणि कार्यक्रमांमध्ये तेच नियम गुंडाळून ठेवतात. त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठीच मर्यादित आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

नवी दिल्ली : एकीकडे कोरोनाचं संकट महाराष्ट्रासह देशभरात चिंतेची बाब ठरली आहे. तर दुसरीकडे नेत्यांना मात्र कोरोनाचा विसर पडला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीत भाजपच्या जनविश्वास यात्रेत तूफान गर्दी होती आणि विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात ही जनविश्वास यात्रा होती.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी बैठकांचं सत्र घेत आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाकडून नियम मोडण्याचे एकापाठोपाठ एक विक्रम करत चालले आहेत. आगामी काळात उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. पण जी जनता मतदान करणार आहे त्या जनतेच्या आरोग्याची सुरक्षा अशा रॅलीमुळे धोक्यात येऊ शकते. या रॅलीवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहे.
ओमाक्रॉन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आणि राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात प्रायमरी आणि ज्युनिअर हायस्कूलमध्ये हिवाळ्याच्या सुट्या देण्यात आल्या आहेत.
#WATCH | Union Home Minister Amit Shah holds a roadshow in Bareilly, Uttar Pradesh pic.twitter.com/zkPVt8n4lu
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 31, 2021
गृहमंत्री अमित शाह यांचा रोड शो शुक्रवारी कुतुबखाना येथून सुरू झाला. दरम्यान अमित शाह यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मंत्री संतोष गंगवार या वेळी उपस्थित होता. दरम्यान मुलायम सिंह यूथ ब्रिगेड प्रदेशचे सचिव एजाज अहमद यांनी अमित शाह यांच्या रॅलीला काळा झेंडा दाखवत विरोध करण्यास जाणार होते. परंतु तोपर्यंत पोलिसांनी एजाज अहमद यांनी फिनिक्स मॉलच्या जवळ त्यांना अटक करण्यात आली.
नेतेमंडळीच निर्बंध लावतात आणि अशा कार्यक्रमांमध्ये तेच नियम गुंडाळून ठेवतात. त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठीच मर्यादित आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. नियम मोडल्यास तात्काळ गुन्हे दाखल होत असताना मंत्र्यांना नियमावली नाही का असा सवाल आता विचारण्यात येत होता.























