एक्स्प्लोर

माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवृत्तीचे संकेत

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सोनिया यांना आता तुमची काय भूमिका असेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर सोनिया गांधींनी मिश्किलपणे (हसत-हसत) ‘मी निवृत्त होणार आहे.’

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं राहुल गांधींच्या हाती आल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या पक्षात नेमकी काय भूमिका बजावणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. याच प्रश्नाचं उत्तर खुद्द सोनिया गांधी यांनी दिलं आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सोनिया यांना आता तुमची काय भूमिका असेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर सोनिया गांधींनी मिश्किलपणे (हसत-हसत) ‘मी निवृत्त होणार आहे.’ असं वक्तव्य केलं. असं असलं तरीही त्यांनी आपल्या निवृत्तीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा मात्र सुरु झाली आहे. दरम्यान, सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार नसल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. ‘सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष पदावरुन पायउतार होणार आहेत. राजकारणातून निवृत्त नाही.’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहं. गेले काही दिवस प्रकृतीमुळे सोनिया गांधी या राजकारणापासून बऱ्याच दूर होत्या. अशावेळी राहुल गांधींच्या हातात पक्षाची सारी सूत्रं सोपवण्यात यावीत अशी मागणी पक्षात जोर धरु लागली होती. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूकही पार पडली. ज्यात राहुल गांधी बिनविरोध निवडून आले. ते उद्या (शुक्रवार) अध्यक्षपदाचा कार्यभार संभाळणार आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या 900 सदस्यांनी राहुल गांधींचे जवळपास 90 अर्ज दाखल केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित होतं. गांधी घराण्यातील सहावे आणि काँग्रसचे 18 वे अध्यक्ष दरम्यान, राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे अध्यक्ष ठरले आहेत. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती आहेत. याआधी मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा, इंदिरा गांधी दोन वेळा, राजीव गांधी एक वेळा, सोनिया गांधी एक वेळा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संबंधित बातम्या अखेर राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड! गेल्या 39 वर्षांपैकी 32 वर्ष काँग्रेसवर नेहरु-गांधी घराण्याचं राज्य  ‘घराणेशाही हीच काँग्रेसची परंपरा’, विरोधकांची जोरदार टीका  राहुल गांधींवरुन पूनावाला बंधूंमध्ये वाद, तहसीन यांनी नातं तोडलं

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget