मुस्लिम लोकसंख्या वाढीचा वेग अधिक, ख्रिश्चन धर्माला टाकणार मागे? नेमकं काय सांगतो अहवाल?
दरवर्षी संपूर्ण जगाची लोकसंख्या झपाट्यानं वाढत (Population Growth) आहे. आत्तापर्यंत संपूर्ण जगाची लोकसंख्या ही 7.3 अब्ज आहे.
Population Growth : दरवर्षी संपूर्ण जगाची लोकसंख्या झपाट्यानं वाढत (Population Growth) आहे. आत्तापर्यंत संपूर्ण जगाची लोकसंख्या ही 7.3 अब्ज आहे. यामध्ये अनेक धर्म आणि समाजातील लोकांचा समावेश आहे सध्या ख्रिश्चन हा सर्वात मोठा धर्म आहे. त्यानंतर इस्लाम आणि नंतर हिंदू धर्म आहे. लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी जगभरातील देशांमध्ये अनेक प्रकारचे नियम आणि कायदे करण्यात आले आहेत. भारतातही गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढणारी लोकसंख्या हा राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, सध्या मुस्लिम लोकसंख्या वेगानं वाढत असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.
लोकसंख्या वाढ ही जगातील एक मोठी समस्या आहे. अमेरिकेपासून भारत आणि चीनपर्यंत अनेक देश कठोर कायदे आणण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. चीनमध्ये दीर्घकाळापासून एक मूल धोरण आहे.
2070 पर्यंत इस्लाम धर्म ख्रिस्ती धर्माला मागे टाकणार
प्यू रिसर्चने एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये वाढत जाणाऱ्या लोकसंख्येच्या संदर्बातचील माहिती देण्यात आली आहे. या अहवालत दिलेल्या माहितीनुसार, इतर धर्मापेक्षा इस्लाम धर्म वेगाने वाढत आहे. त्याचप्रमाणे, जगातील बहुतेक प्रमुख धर्म देखील 2050 पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. 2050 पर्यंत, ख्रिश्चन धर्म हा सर्वात मोठा धार्मिक गट असेल, परंतु 2070 पर्यंत, इस्लाम ख्रिस्ती धर्माला मागे टाकून जगातील प्रमुख धर्म बनेल.
कोणताही धर्म न मानणाऱ्या लोकांची संख्या कमी होतेय
जगात असे लोक आहेत जे कोणत्याही धर्माशी संबंधित नाहीत. त्यांना नास्तिक म्हणता येईल. या लोकसंख्येमध्येही मोठी घट झाली आहे. मात्र, अमेरिका आणि फ्रान्ससारख्या देशांमध्ये या लोकांची लोकसंख्या वाढत आहे.
2010 ते 2050 या कालावधीत विविध धर्मांच्या लोकसंख्येमध्ये झालेली वाढ दिसून आली आहे. या आकडेवारीत 2010 मध्ये ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या 216 कोटी होती, जी 2050 पर्यंत 291 कोटींहून अधिक होईल, असे सांगण्यात आले आहे. या 40 वर्षांत ख्रिश्चन धर्म मानणाऱ्या लोकांची लोकसंख्या सुमारे 75 कोटींनी वाढणार आहे. म्हणजे ख्रिश्चन धर्माची वार्षिक लोकसंख्या 1 कोटी 87 लाख असेल.
दरवर्षी वाढतेय मुस्लिम लोकसंख्या
इस्लाम धर्माची लोकसंख्या 2010 पर्यंत सुमारे 150 कोटी होती, जी 2050 मध्ये 276 कोटींहून अधिक होईल. याचा अर्थ या 40 वर्षांत इस्लाम धर्म मानणाऱ्यांची लोकसंख्या 116 कोटींनी वाढणार आहे. म्हणजे इस्लाम धर्माची लोकसंख्या दरवर्षी 2 कोटी 90 लाखांनी वाढेल आणि दर महिन्याला 24 लाखांनी वाढण्याची शक्यता आहे.
हिंदू धर्माच्या लोकसंख्येबद्दल काय सांगते आकडेवारी?
हिंदू धर्माबद्दल बोलायचे झाले तर, 2010 मध्ये त्याची लोकसंख्या 103 कोटी होती, जी 2050 मध्ये 138 कोटी होईल. याचा अर्थ या 40 वर्षांत हिंदू धर्म मानणाऱ्यांची लोकसंख्या 35 कोटींहून अधिक होईल. या धर्माची वार्षिक लोकसंख्या 7 लाखांहून अधिक आहे.
'या' धर्माची लोकसंख्या मायनसमध्ये
बौद्ध धर्माबद्दल बोलायचे झाले तर 2010 मध्ये या धर्माची लोकसंख्या 48 कोटी होती. जी 2050 पर्यंत कमी होईल. म्हणजे दरवर्षी या धर्माच्या लोकांची लोकसंख्या उणे 37 हजारांवर येणार असल्याची माहिती अहवालात सांगण्यात आली आहे.