एक्स्प्लोर

लग्नासाठी मुस्लिम तरुणाने हिंदू धर्म स्वीकारला, तरुणीच्या पालकांचा नकार

33 वर्षीय मोहम्मद इब्राहिम सिद्दीकी याने हिंदू धर्मात परिवर्तन केलं आणि आर्यन आर्य असं नाव धारण केलं.

नवी दिल्ली : हिंदू तरुणीशी लग्न करण्यासाठी एका मुस्लिम व्यक्तीने धर्मपरिवर्तन केलं. मात्र तरुणीच्या पालकांनी तिला पतीसोबत राहू देण्यास नकार दिला आहे. अखेर हिंदू धर्मांतर केलेल्या या तरुणाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. 33 वर्षीय मोहम्मद इब्राहिम सिद्दीकी याने हिंदू धर्मात परिवर्तन केलं आणि आर्यन आर्य असं नाव धारण केलं. 23 वर्षीय अंजली जैनसोबत त्याने लग्न केलं. मात्र अंजलीच्या पालकांनी तिला आर्यनसोबत राहू देण्यास नकार दिला. त्यामुळे हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचलं. छत्तीसगड हायकोर्टातही आर्यनची निराशा झाली. अंजलीला आर्यनसोबत राहू देण्यास छत्तीसगड हायकोर्टाने नकार दिला. त्यामुळे या निर्णयाविरोधात आर्यनने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. आपल्या पत्नीच्या स्वातंत्र्यावर तिच्या कुटुंबीयांनी गदा आणली आहे. त्यामुळे आमच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचं आर्यनने याचिकेत म्हटलं आहे. आपण स्वतःच्या मर्जीने लग्न केल्याचं अंजलीचं म्हणणं आहे, तरीही कोर्टाने तिला पालकांसोबत किंवा हॉस्टेलमध्ये राहण्यास सांगितलं आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि जस्टिस डीव्हाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने आर्यनच्या याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाला दिले आहेत. अंजली आणि सिद्दीकी लग्नापूर्वी दोन-तीन वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. 23 फेब्रुवारीला त्याने धर्मपरिवर्तन केलं. 25 फेब्रुवारीला छत्तीसगडच्या रायपूरमधील आर्य समाज मंदिरात दोघं लपूनछपून विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर अंजली माहेरी आली, मात्र तिने पालकांना लग्नाविषयी कल्पना दिली नाही. काही दिवसांनी तिच्या आई-वडिलांना या गोष्टीची कुणकुण लागली. त्यावेळी अंजलीने कुटुंबाला न सांगता घर सोडण्याचा निर्णय घेतला. 30 जूनला अंजलीने घरातून पळ काढला, मात्र पतीशी तिची भेट होण्यापूर्वीच पोलिसांनी तिला शोधलं. तिची रवानगी सरकारने स्थापन केलेल्या सखी महिलाश्रमात करण्यात आली. अंजलीला पालकांसोबत राहायचं आहे, असा तिचा खोटा जबाब पोलिसांनी नोंदवल्याचा आरोप आर्यनने केला. त्याने हायकोर्टात धाव घेतली, तेव्हा 30 जुलैला हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी अंजली आणि तिच्या पालकांना बजावलं. अंजली आणि आर्यन यांची केस केरळातील हादिया आणि शफिन जहां यांच्याशी मिळतीजुळती आहे. हादियाने लग्नासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. केरळ हायकोर्टाने हादियाला पालकांकडे पाठवण्याचे आदेश दिले, मात्र हादिया-शफिनचं लग्न वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला.

महत्त्वाच्या बातम्या

दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget