एक्स्प्लोर

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना दिलासा कायम, मानहानीच्या खटल्यात 28 जुलैपर्यंत हायकोर्टातील सुनावणीला स्थगिती

"चौकीदार चोर है" असं पंतप्रधानांचा उल्लेख केल्याबद्दल राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यावर गिरगाव दंडाधिकारी कोर्टाला 28 जुलैपर्यंत सुनावणी न घेण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम ठेवत त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 28 जुलैपर्यंत तहकूब केली आहे. तसेच गिरगाव दंडाधिकारी कोर्टाला याप्रकरणी 28 जुलैपर्यंत सुनावणी स्थगित करण्याचे निर्देश जारी केलेत. याप्रकरणात दोन्ही बाजूंचे मुख्य वकील गैरहजर असल्यानं नजीकची तारीख देण्यात यावी अशी दोन्ही बाजूंकडनं विनंती करण्यात आल्यानं न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी ही सुनावणी तूर्तास तहकूब केली.

काय आहे राहुल गांधींची याचिका?
राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याच्या आरोप करत राहुल गांधींविरोधात मुंबईत साल 2019 मध्ये मानहानीचा खटला दाखल झाला आहे. या दाव्यावर फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले असून त्याबाबत राहुल गांधींना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले गेले होते. याचप्रकरणी दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

काय आहे प्रकरण?
राहुल गांधी यांनी राफेलबाबत टीका करताना मोदी यांच्यावर 'कमांडर इन थीफ', 'चौकिदार चोर है', 'चोरो का सरदार'अशी टीका केली होती. यामुळे मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टी व त्यातील सदस्यांचीही प्रतिम मलिन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या विधानांमध्ये या याचिकेत समावेश आहे. तक्रारदार हे भाजपचे सदस्य असल्यामुळे ते अशाप्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना आहे, असं मत व्यक्त करत या गिरगाव दंडाधिकारी कोर्टानं याची दखल घेत राहुल गांधींच्या नावे समन्स जारी केलं होतं. याशिवाय राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी आणि शिवडी न्यायालयातही मानहानीच्या तक्रारी प्रलंबित आहेत. 

20 सप्टेंबर 2018 रोजी जयपूरच्या एका सभेत राहुल गांधींनी, "गली गली मे शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है" असा नारा दिला होता. तसेच 24 सप्टेंबरला एक ट्विट करून राहुल गांधींनी मोदींना उद्देशून अपमानकारक, मानहानीकारक विधानं केली होती. ज्यामुळे तमाम भारतीयांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन झाल्याचा दावा या तक्रारीतून करण्यात आला आहे. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्याबाबतीत अशी विधान करून राहुल गांधींनी भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांचाही अपमान केला आहे. असा दावा या याचिकेतून करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget