एक्स्प्लोर

जनता चौकीदार चोर है म्हणणारच : शत्रुघ्न सिन्हा

देशाला परिवर्तनाची गरज आहे. परिवर्तन घडवण्याचा निश्चय जनतेनं केला आहे. त्यामुळे लवकरच देशात बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खरं बोलणं ही जर बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे असं म्हणत सिन्हा यांनी मोदी आणि भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत.

कोलकाता: मी आधी भारतीय जनतेचा आहे आणि मग भारतीय जनता पार्टीचा आहे. जोपर्यंत पंतप्रधान बोलणार नाहीत, तोपर्यंत 'चौकीदार चोर है' ही टीका ऐकून घ्यावीच लागेल, अशा शब्दात भाजप खासदार खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा भाजपाला घरचा आहेर दिला. विरोधकांच्या महारॅलीला संबोधित करताना खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोधकांची एकी शानदार असल्याचं म्हणत त्यांनी महाआघाडीतील अनेकांचं तोंडभरुन कौतुक केलं. सिन्हा म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय पक्षाचा नव्हता. हा निर्णय मनमानीपणाचा नमुना होता. तो निर्णय पक्षाचा असता, तर लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींना याची कल्पना असती. रातोरात हा निर्णय घेण्यात आला.  आपल्या माता-भगिनींनी चांगल्या हेतूनं ज्या पैशांची बचत केली, तेच पैसे बँकेत जमा करण्यासाठी त्यांना रांगा लावल्या लागल्या', अशा शब्दांमध्ये सिन्हा यांनी  मोदींवर टीका केली. यावेळी तीन राज्यांमध्ये काँग्रेसनं मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं अभिनंदन केलं. देशाला परिवर्तनाची गरज आहे. परिवर्तन घडवण्याचा निश्चय जनतेनं केला आहे. त्यामुळे लवकरच देशात बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खरं बोलणं ही जर बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे असं म्हणत सिन्हा यांनी मोदी आणि भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी वज्रमूठ बांधली 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी एकत्र वज्रमूठ बांधली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी कोलकाता येथे भाजप विरोधकांना एकत्र आणणारी ‘भारतीय एकता सभा’ आयोजित केली. ही सभा भाजपविरोधातील आघाडीचा आणखी एक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. या सभेत शरद पवार, फारुख अब्दुल्ला, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, शरद यादव, अरविंद केजरीवाल अशा विविध पक्षाची नेतेमंडळी उपस्थित होती. विरोधकांसह भाजपचे बंडखोर शत्रुघ्न सिन्हा आणि यशवंत सिन्हा हे देखील महारॅलीला उपस्थित होते. या सभेत सर्वच विरोधकांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी शेतकरी विरोधी आहेत. त्यांनी घटनात्मक संस्थांचा ऱ्हास केला. देशात अघोषित आणीबाणी आली आहे. मोदींनी सबका साथ घेऊन सबका विनाश केला, असे घणाघाती शाब्दिक हल्ले आज कोलकात्यातील विरोधकांच्या संयुक्त भारत मेळ्यातून पंतप्रधान मोदींवर करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी आणि भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकाच मंचावर आले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात भारतीय एकता सभेचं आयोजन केलं होतं. ही सभा भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्यासाठीचा नवा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय. ममता यांनी आयोजित केलेल्या या सभेत देशभरातील 22 विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. यात देशभरातील प्रादेशिक पक्षांचा सहभाग अधिक आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र या सभेला गैरहजर राहिले. विरोधकांसह भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हादेखील उपस्थित राहिले. मोदी सरकारची ‘एक्सपायरी डेट’आता संपली : ममता बॅनर्जी   मोदी सरकारची ‘एक्सपायरी डेट’आता संपली आहे. भाजप भगाओ - देश बचाओ या नाऱ्याला प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. तसेच पंतप्रधान पदाचा आमचा उमेदवार निवडणुकीनंतर घोषित केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. राजकारणात शिष्टता असते मात्र भाजप त्याचे पालन करत नाही. जे भाजपसोबत नाहीत त्यांना चोर समजले जाते. आपल्याला एकत्रित येऊन काम करायला हवे, असेही बॅनर्जी म्हणाल्या. धर्माच्या आधारे लोकांचे विभाजन केले : अब्दुल्ला मी मुस्लीम आहे, पण मी देखील भारतातील एक भाग आहे. जम्मू- काश्मीरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भारतासोबत रहायचे आहे, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाल्यानंतर देशासमोर आता एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. धर्माच्या आधारे लोकांचे विभाजन केले जात असून आता देशाचे रक्षण करायचे असल्यास सर्वांनी पुन्हा एकत्र येणे गरजेचे आहे. भाजपाला संपवण्यासाठी विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकीत एकत्र आले पाहिजे, असे आवाहन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Veteran Actress Pavala Shyamala Passes Away: आर्थिक अडचणींशी झुंज, उपचारासाठी पैसे नसल्यानं रुग्णालयानं हाकललं, रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसलेली दिग्गज अभिनेत्री, अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
आर्थिक अडचणींशी झुंज, उपचारासाठी पैसे नसल्यानं रुग्णालयानं हाकललं, रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसलेली दिग्गज अभिनेत्री, अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
Embed widget