एक्स्प्लोर

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाकडून रद्द 

MP Mohan Delkar suicide case:   प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यासह 9 बड्या सरकारी अधिका-यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

MP Mohan Delkar suicide case:  दादरा नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा अखेर हायकोर्टानं रद्द केला आहे. कायद्याचा गैरवापर टळण्यासाठी हा गुन्हा रद्द करणं आवश्यक असल्याचं मत हायकोर्टानं या निकालात नोंदवल आहे. याप्रकरणी 5 जुलैला राखून ठेवलेला आपला निकाल न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठानं गुरूवारी जाहीर केला. या निकालामुळे याप्रकरणात नाव आलेल्या नऊ बड्या व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे.
हा गुन्हा रद्द करण्यासाठी दादरा नगर हवेलीचे मुख्य प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यासह सिव्हासा येथील जिल्हाधिकारी संदिप कुमार सिंह, एसपी शरद दराडे, तत्कालीन उप जिल्हाधिकारी अपूर्व शर्मा, उपविभाग अधिकारी मानसी जैन, सिल्वासा पोलीस निरिक्षक मनोज पटेल,व्यवस्थापकीय अधिकारी रोहित यादव, तलाठी दिलीप पटेल यांच्यासह फत्तेसिंह चौहान या राजकीय पुढा-यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

काय आहे प्रकरण -
खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये 22 फेब्रुवारी 2021 रोजी पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. डेलकर यांनी आत्महत्या केल्यानं अनेकांना धक्का बसला होता. दादरा-नगर हवेलीच्या खासदारानं मुंबईत येऊन आत्महत्या का केली?, असा प्रश्न उपस्थित झाला. तसेच गुजराती भाषेत लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सातत्यानं मानसिक छळ होत असल्याचं लिहिलं होतं. याप्रकरणी तपास करून मुंबई पोलिसांनी डेलकारांचा मुलगा अभिनव डेलकर याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करत चिठ्ठीत नावं लिहिलेल्या सर्वंना आरोपी केलं होतं. 

याचिकाकर्त्यांचा दावा काय?
मात्र मुंबई पोलीसांनी दाखल केलेली एफआयआर बिनबुडाची आणि चुकीची आहे. आपल्याविरोधात या एफआयआरमध्ये कोणताही विशिष्ट आरोप करण्यात आलेला नाही. आपली आणि डेलकरांची कधीही वैयक्तिक ओळख नव्हती, देलकरांच्या संस्थेची आपण फक्त चौकशी केली होती. तसेच ही घटना ही मुंबईत घडली असली तरी कथित गुन्ह्याचे मूळ हे दादरा-नगर हवेलीमध्ये दडलेलं आहे. त्यामुळे एफआयआर तिथं वर्ग होणे अपेक्षित होतं मात्र केवळ राजकीय दबावातून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा जिल्हाधिकारी संदीप सिंह यांनी आपल्या याचिकेतून केला होता. याशिवाय परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमध्येही याप्रकरणाचा उल्लेख होता. हे प्रकरण दादरा-नगर हवेली पोलिसांकडे वर्ग करायला हवं, असं परमबीर सिंग यांनी वरिष्ठांना सुचवलं होतं. मात्र, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दबावामुळे मुंबईत एसआयटी स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे यामागचा राजकीय हेतू सिद्ध होतोय असा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. 

कोण होते महन डेलकर -
58 वर्षीय मोहन डेलकर हे साल 1989 पासून दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. ते दादरा आणि नगर हवेली येथून तब्बल 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. साल 2009 मध्ये ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरत मोठ्या मतांनी पुन्हा विजयी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget