India China Border : सीमेवर ड्रॅगनच्या हालचाली पुन्हा वाढल्या, अरुणाचल सीमेवर चीननं वसवली गावं
China on LAC : लेफ्टनंट जनरल आरपी कलिता यांनी सांगितलं की, चीनकडून तिबेटीय प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) वेगानं बांधकाम सुरुच आहेत. चीननं इथे रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्ग विकसित करत आहे.
China Building Infrastructure Along LAC : 'ड्रॅगन'च्या कुरापती काही थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) हालचाली सुरुच आहेत. चीनने एलएसीजवळ गाव वसवल्याची माहिती लष्कराने दिली आहे. भारतीय लष्कराने सोमवारी सांगितलं की, चीन अरुणाचल प्रदेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. चीननं इथं गावंही वसवली आहेत. भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज आहे. चीनच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जात असल्याचं लष्कराने सांगितलं आहे.
लेफ्टनंट जनरल आरपी कलिता यांनी सांगितले की, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) अरुणाचल प्रदेशाजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर पायाभूत सुविधा वाढवत आहे. सीमेवर कोणत्याही संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे.
जनरल कलिता यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, चीन तिबेट प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) वेगानं बांधकाम करत आहे. चीननं इथे रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्ग विकसित केले आहेत. चीनने LAC च्या बाजूने सीमावर्ती भागात गावं विकसित केली आहेत. यांचा उपयोग चीन आपली उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी करु शकतो.
चीन अरुणाचल प्रदेशाच्या सीमावर्ती भागात रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्ग तसेच 5G मोबाइल नेटवर्क सतत अपग्रेड करत आहे. चीनला याचा उपयोग त्यांच्या सैन्याला प्रतिसाद देण्यासाठी किंवा हलवण्यास होईल. भारतीय लष्कर सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य ती पाऊलं उचलण्यासाठी तयार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या