एक्स्प्लोर

Morning Headlines 5th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. Monsoon Update : मान्सून लांबला! केरळसह महाराष्ट्रातही पाऊस 4 ते 5 दिवस उशिराने

India Monsoon Update : यंदाचा मान्सून लांबला आहे. केरळमध्ये (Kerala Monsoon Update) पाऊस सुरु होण्याची तारीख लांबली आहे. भारतीय हवामान खात्याने आता मान्सून तीन ते चार दिवस उशीराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये 4 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. पण अद्याप केरळमध्ये मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनची प्रतिक्षा लांबली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून आता लक्षद्विपपर्यंत पोहोचला आहे. केरळमध्ये मान्सून तीन ते चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिक्षा लांबली असून सर्वसामान्यांनाही आणखी काही दिवस उन्हाची झळ सोसावी लागणार आहे. वाचा सविस्तर 

2. Wrestlers Protest: "सरकार कोणाचाच बचाव करत नाहीये..."; अखेर कुस्तीपटूंच्या आंदोलनावर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सोडलं मौन

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या अटकेची मागणी करत गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटूंनी आंदोलन (Wrestlers Protest) छेडलं आहे.  गेल्या दीड महिन्यांपासून कुस्तीपटू सरकारकडे बृजभूषण शरण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची मागणी सातत्यानं करत आहेत. यावर मात्र भाजप (BJP) सरकार मूग गिळून गप्प बसल्याची आणि बृजभूषण यांना पाठीशी घालत असल्याचे आरोप सातत्यानं होत आहेत. अशातच आता याप्रकरणी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मौन सोडलं आहे. सरकारचीही आंदोलक कुस्तीपटूंना न्याय मिळावा अशीच इच्छा आहे, असं ते म्हणाले. वाचा सविस्तर

3. Odisha Train Accident: ओडिशा दुर्घटनेनंतर 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना; रेल्वेमंत्र्यांची हात जोडून प्रार्थना, पाहा Video

Train movement resumes in Balasore: ओडिशाच्या (Odisha) भीषण अपघातानंतर तब्बल 51 तासांनी बालासोर (Balasore Train Accident) येथील अपघातग्रस्त (Accident) भागातून पहिली ट्रेन रवाना झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अनेक माध्यमांचे प्रतिनिधी आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते. मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती. तसेच, ज्या रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी भीषण अपघात झाला होता, त्याच रेल्वे ट्रॅकवरुन मालगाढी रवाना झाली. वाचा सविस्तर

4. Odisha Train Accident: रेल्वे दुर्घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय; ओडिशा पोलिसांचं निवेदन, नेमका कोणाकडे इशारा?

Coromandel Train Accident: ओडिशातील (Odisha) बालासोर (Balasore Train Accident) येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानं संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातानंतर (Accident), रविवारी (4 जून) ओडिशा पोलिसांनी एक निवेदन जारी केलं. त्यामध्ये म्हटलंय की, काही सोशल मीडिया अकाउंटवरुन ओडिशा रेल्वे दुर्घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, यावेळी रेल्वे अपघाताबाबत कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारी पोस्ट शेअर करू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. वाचा सविस्तर

5. Odisha Train Accident: "मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन..."; ओडिशातील अपघातग्रस्त रेल्वे रुळांवर विखुरली प्रेम कहाणी

Coromandel Express Accident: 2 जून 2023... शुक्रवारी संध्याकाळी ओडिशातील (Odisha Train Accident) बालासोरमध्ये (Balasore) तीन ट्रेनची एकमेकांना धडकल्या आणि भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 270 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या रेल्वे दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हळहळला. या अपघातात अनेकांचा बळी गेला. कोणी आपली आई गमावली, कोणी वडील, कोणी भाऊ, तर कोणी बहिण... एवढंच नाहीतर तर या अपघातग्रस्त रेल्वे रुळावर काही प्रेम कहाण्याही अधुऱ्या राहिल्यात... पाहुयात नेमकं काय प्रकरण आहे ते... वाचा सविस्तर

6. Rahul Gandhi US Visit: "एकीकडे महात्मा गांधी, तर दुसरीकडे नथुराम गोडसे, दोन विचारधारांमध्ये युद्ध"; न्यूयॉर्कमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य

Rahul Gandhi Addresses Indian Diaspora:  काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींनी सोमवारी (5 जून) स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता न्यूयॉर्कमधील जेविट्स सेंटरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केलं. आपल्या भाषणात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारतात दोन प्रकारच्या विचारधारा आहेत. ज्यात एकीकडे नथुराम गोडसेची विचारधारा आहे, तर दुसरीकडे महात्मा गांधींची विचारधारा आहे. महात्मा गांधींच्या विचारसरणीनं आम्ही पुढे जात आहोत. वाचा सविस्तर 

7. Rahul Gandhi In US: "भारताची सभ्यता कोणाचाही द्वेष करणं किंवा कोणाचा अपमान करणं नाही"; न्यूयॉर्कमध्ये राहुल गांधींनी सांगितली 'मोहब्बत वाली बात'

Rahul Gandhi In New York: काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशांच्या लोकांशी भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. सोमवारी (05 जून) भारतीय वेळेनुसार, राहुल गांधींनी न्यूयॉर्कमध्ये NRI लोकांना संबोधित केलं. वाचा सविस्तर 

8. WTC Final 2023 : मागील पराभवातून टीम इंडिया काय शिकणार? 'या' तीन चुका टीम इंडियाला पडू शकतात महागात

IND vs AUS, WTC Final 2023 : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) दुसऱ्या हंगामाचा अंतिम सामना 7 जूनपासून सुरु होणार आहे. अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने येतील. भारतीय संघ सलग दोन हंगामात अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला आहे. मागच्या हंगामातील निसटलं विजेतेपद विसरून टीम इंडिया यंदा चॅम्पियनशिप ट्रॉफीवर नाव कोरण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा थरार रंगणार आहे. वाचा सविस्तर

9. 5th June in History: जागतिक पर्यावरण दिन, संघटित कामगार चळवळीचे जनक ना.म. जोशी यांचा जन्म; आज इतिहासात...

5th June in History: जून महिना सुरू झाला आहे. दरम्यान, या महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे.जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात आजच्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे, हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज जागतिक पर्यावरण दिन आहे, तर भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक समजले जाणारे नारायण मल्हार जोशी यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. जाणून घेऊयात 5 जूनचे दिनविशेष सविस्तर... वाचा सविस्तर 

10. Horoscope Today 05 June 2023 : कर्क, धनु, मकर राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

Horoscope Today 05 June 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वृषभ राशीच्या लोकांच्या घरात सुख-शांती राहील. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget