Morning Headlines 27th June : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
EPFO चा मोठा निर्णय! वाढीव पेन्शन योजनेची मुदत वाढवली, आता 'या' तारखेपर्यंत करू शकता अर्ज
भविष्य निर्वाह निधीच्या कोट्यावधी सभासदांसाठी पुन्हा एकदा चांगली बातमी समोर आली आहे. EPFO ने अधिक पेन्शनचा (Higher Pension) पर्याय निवडण्यासाठीच्या मुदतीत वाढ केली आहे. अधिक पेन्शनसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 जुलैपर्यंत वाढवली आहे (वाचा सविस्तर)
उत्तर भारतात जोरदार पाऊस, हिमाचलसह उत्तराखंडमध्ये ढगफुटी; आजही मुसळधार पावसाचा इशारा
देशातील वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. काही भागात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. विशेषत उत्तर भारतात पावसाचा जोर वाढला आहे. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडच्या (Uttarakhand) अनेक भागात भूस्खलनासोबतच ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. (वाचा सविस्तर)
आम्ही जगाला दहशतवादाविरुद्ध सहिष्णुतेचा मार्ग सांगितला', जम्मू आणि काश्मीरमध्ये राजनाथ सिंह यांचं वक्तव्य
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे आज जम्मू आणि काश्मीरच्या (Kashmir) दौऱ्यावर असताना त्यांनी दहशतवादाविरोधात भाष्य केलं आहे. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्याचा देखील उल्लेख केला आहे. (वाचा सविस्तर)
स्पर्मची अदलाबदली करणे दिल्लीतील रुग्णालयाला पडलं महागात, ठोठावला 1.5 कोटींचा दंड
दिल्लीतील एका खासगी रुग्णालयाला शुक्राणूंची (sperm mix-up) अदलाबदली करणे चांगलंच महागात पडलं. नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनने (NCDRC) त्या रुग्णालयाला आणि डॉक्टरांना दीड कोटींचा दंड ठोठावला आहे. दिल्लीतील एका महिलेच्या गर्भधारण प्रक्रियेत (Assisted Reproductive Technique ART) तिच्या पतीच्या स्पर्मचा वापर न करता दुसऱ्याच एका व्यक्तीच्या स्पर्मचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर कमिशनने रुग्णालयाला हा दंड ठोठावला आहे. (वाचा सविस्तर)
विमानात किळसवाणा प्रकार! प्रवाशानं सर्वांसमोरच केलं 'हे' कृत्य
एअर इंडियाच्या (Air India) विमानात एका प्रवाशाने लघवी (Urinate) आणि शौच (Defecating) केली. इतकंच नाही तर तो पूर्ण फ्लाईटमध्ये थुंकत होता. मुंबई-दिल्ली फ्लाईटदरम्यान (Mumbai-Delhi Air India Flight) ही घटना घडली आहे. या प्रवाशाने सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्ससमोर हे गैरवर्तन केलं. या प्रवाशाला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. (वाचा सविस्तर)
धक्कादायक! प्रसिद्ध कॉमेडी यूट्यूबर देवराज पटेलचा रस्ते अपघातात मृत्यू, चाहत्यांवर शोककळा
छत्तीसगडमधील प्रसिद्ध कॉमेडी यूट्यूबर देवराज पटेल (Youtuber Devraj patel) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव वेगानं आलेल्या ट्रकने देवराज पटेलच्या दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये देवराज पटेलचा जागीच मृत्यू झाला आहे. (वाचा सविस्तर)
Horoscope Today : कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य
आज वार मंगळवार. दिनांक 27 जून 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पाहुयात आजचा मंगळार मेष ते मीन या राशींसाठी कसा राहील? (वाचा सविस्तर)
सरसेनापती धनाजी जाधव यांचं निधन, 'पंचमदा' यांची जयंती, इतिहासात आज
आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 27 जून रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. मराठा सैन्याचे सरसेनापती धनाजी जाधव यांचं निधन झाले होते. तर भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार आरडी बर्मन यांचा जन्म झाला होता. मुंबईमध्ये इमारत कोसळल्यामुळे 19 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. (वाचा सविस्तर)