देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. Cyclone Biparjoy : 48 तासांत भारतात धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ; गुजरातला ऑरेंज अलर्ट, NDRF तैनात
Cyclone Biparjoy Update : अत्यंत तीव्र बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) हळूहळू गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) सुमारे 48 तासांनी भारतातील गुजरात आणि पाकिस्तानच्या कराची येथील किनारपट्टी धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी मांडवी आणि कराची येथे धडकण्याची शक्यता आहे. गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
2. Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 67 रेल्वे गाड्या रद्द, रेल्वे मंत्रालयाकडून वॉर रुमची स्थापना
Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळामुळं (Cyclone Biparjoy) अरबी समुद्राला उधाण आलं आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार 15 जून रोजी हे चक्रीवादळ 125 ते 135 किमी प्रतितास वेगाने गुजरात आणि पाकिस्तान कराचीला धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून 67 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमची स्थापना केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ अनिल कुमार लाहोटी आणि इतर बोर्ड सदस्य परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. वाचा सविस्तर
3. Weather : बिहारमध्ये मान्सूनने मोडला 17 वर्षांचा विक्रम, वाचा पुढील 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज?
Weather Update : बिहारमध्ये (Bihar) मान्सूनने 17 वर्षांचा विक्रम मोडला आहे. राज्यात 13 जूनपासून मान्सूनच्या आगमनाचा दिवस निश्चित करण्यात आला होता. मात्र एक दिवस आधीच म्हणजे 12 जून रोजी ईशान्य बिहारमधील पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनचे आगमन होताच पूर्णिया आणि किशनगंज जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू झाला. यापूर्वी 2006 मध्ये 6 जूनला वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता. वाचा सविस्तर
4. Employment Fair: PM मोदी 70 हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्ती पत्र देणार; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार
Employment Fair: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज, मंगळवारी (13 जून) देशातील 70 हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे वितरित करणार आहेत. रोजगार मेळा उपक्रमांतर्गत या भेटींचं वितरण करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये पीएम मोदींनी यासंदर्भात घोषणा केली होती. पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात येतील, असं त्यावेळी मोदींनी सांगितलं होतं. त्यानुसार आज ते देशातील तब्बल 70 हजार तरुणांना नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे वितरित करणार आहेत. वाचा सविस्तर
5. ...अन् हवाई दलाच्या मदतीनं मध्यप्रदेश सरकारच्या सातपुडा भवनातील आग आटोक्यात; चौकशीसाठी समिती गठित
Bhopal Fire Updates: भोपाळमधील (Bhopal Fire Updates) सचिवालयासमोर असलेल्या मध्यप्रदेश सरकारच्या (Madhya Pradesh Government) सातपुडा भवन (Satpura Bhawan) इमारतीला सोमवारी दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली. आग तिसऱ्या मजल्यावर लागली होती, पण पाहता पाहता ती सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. आग विझवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे हवाई दलाची (Air Force) मदत मागितली. तात्काळ हवाई दलाला पाचारण करण्यात आलं. एएन 32 विमाने आणि एमआय-15 हेलिकॉप्टर रात्रीच घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. आगी एवढी भीषण होती की, हवाई दलालाही आगीवर नियंत्रण मिळवणं अवघड होत होतं. अखेर हवाई दलाच्या मदतीनं भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. वाचा सविस्तर
6. Ram Mandir : ठरलं! 'या' दिवशी होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, पंतप्रधान मोदींना पाठवलं निमंत्रण; त्यानंतर भाविकांना घेता येणार दर्शन
Ayodhya Ram Mandir : अयोध्येच्या राम मंदिरामध्ये (Ram Mandir) रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्याची तारीख ठरली आहे. रामलल्लाची (Ram Lalla) पूजा आणि प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्याते जोरदार तयारी सुरु आहे. पूजेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. अद्याप या निमंत्रणावर पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. राम मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरामध्ये रामलल्लाची (Ram Lala) प्राणप्रतिष्ठा केली जाईल. यासाठी सर्वतोपरी तयारी सुरु आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं भाविकांसाठी कधी खुलं याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वाचा सविस्तर
7. ODI World Cup 2023 : वर्ल्डकपवरुन राजकारण रंगणार? अहमदाबादमध्ये होणारा भारत vs पाकिस्तान सामना शिवसेनेला मान्य? मुख्यमंत्री शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
ODI World Cup 2023 : यंदा ऑक्टोबर महिन्यात वन डे क्रिकेट वर्ल्डकप (ODI World Cup 2023 in India) होणार आहे, ज्याचं यजमानपद भारताकडे (India News) आहे. महत्त्वाचं म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Ahmedabad's Narendra Modi Stadium) रंगणार आहे. याच मुद्द्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) याबाबत काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण पाकिस्तानी संघानं (Pakistan Cricket Team) भारतात खेळण्यास बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत, तर आशिष शेलार हे खजिनदार आहे. त्यामुळे या सामन्याबाबत ठाकरे गट आणि शिवसेना काय भूमिका घेतात, ते पाहावं लागेल. वाचा सविस्तर
8. SIPRI Report : भारताची तयारी पाहुन उडेल पाकिस्तान अन् 'ड्रॅगन'ची झोप; हद्दीत घुसून थेट हल्ल्याची तयारी
SIPRI Reoprt On Nuclear Weapon : भारत (India) गेल्या काही काळापासून आपलं युद्धकौशल्य आणि युद्धसामग्री वाढवण्यावर भर देत आहे. चीन (China) आणि पाकिस्तान (Pakistan) हे भारताचे 'दुश्मन' असल्याचं जगजाहीर आहे. चीन (India China Relation) आणि पाकिस्तान (India Pakistan Relation) वारंवार कुरापती करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. भारताने ही त्यांना वेळोवेळी चोख उत्तर दिलं आहे. आता चीन आणि पाकिस्तानला भारताचं नाव ऐकून धडकी भरावी असा, अहवाल समोर आला आहे. सिपरी अहवालात समोर आलं आहे की, भारत वेगाने आण्विक हत्यारे विकसित करण्यावर भर देत आहे. वाचा सविस्तर
9. Park Soo Ryun Passes Away: पायऱ्यांवरून पडून 29 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू; कुटुंबियांचा अवयवदानाचा निर्णय
Snowdrop Actress Park Soo Ryun Passes Away: कोरियन अभिनेत्री पार्क सू रयून (Park Soo Ryun) हिचं आकस्मिक निधन झालं आहे. ती 29 वर्षांची होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 11 जून रोजी पार्क घरी जात असताना पायऱ्यांवरून तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली होती. त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पायऱ्यांवरुन पडल्यानंतर तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पार्कला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. पार्कला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. वाचा सविस्तर
10. 13th June In History: साहित्यिक, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आचार्य अत्रे, गझल सम्राट मेहदी हसन यांचे निधन; आज इतिहास
13th June In History: आजचा दिवस सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. साहित्य, चित्रपट, पत्रकारिता, सामाजिक-राजकीय लढे यामध्ये मोलाचे योगदान देणारे प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार, सर्वांचे लाडके आचार्य अत्रे यांचे निधन आजच्या दिवशी झाले. जगभरात क्रांतीची लाट सुरू असताना भारतात लोकशाही मार्गाने स्थापन झालेल्या कम्युनिस्ट सरकारचे पहिले मुख्यमंत्री ई.एम. एस. नंबुद्रीपाद यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. तर, गझल सम्राट मेहदी हसन यांचे निधन आजच्या दिवशी झाले. वाचा सविस्तर
11. Horoscope Today : वृषभ, कर्क, तूळ आणि धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Horoscope Today 13 June 2023 : आज वार मंगळवार. दिनांक 13 जून 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. वृषभ, कर्क, तूळ, धनु राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पाहुयात आजचा मंगळार मेष ते मीन या राशींसाठी कसा राहील? वाचा सविस्तर