Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळामुळं (Cyclone Biparjoy) अरबी समुद्राला उधाण आलं आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार 15 जून रोजी हे चक्रीवादळ 125 ते 135 किमी प्रतितास वेगाने गुजरात आणि पाकिस्तान कराचीला धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून 67 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमची स्थापना केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ अनिल कुमार लाहोटी आणि इतर बोर्ड सदस्य परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
13 जून ते 15 जून या दरम्यान 95 गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. तर 67 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळाच्या प्रभावादरम्यान, स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल पुरेशा साठ्यासह उघडे राहतील जेणेकरून अडकलेल्या प्रवाशांना त्रास होणार नाही. प्रवाशांना रस्त्याने नेण्यासाठी राज्य सरकारच्या बसेस आणि रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
चक्रीवादळाचा फटका गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागांना बसण्याची शक्यता
बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागांना बसण्याची शक्यता आहे. या भागात पश्चिम रेल्वेचे भावनगर, राजकोट आणि अहमदाबाद विभाग येतात. जर आपण चक्रीवादळाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील भागांबद्दल बोललो, तर वेरावळ-जुनागढ विभाग, पोरबंदर-कनालूस विभाग, राजकोट-ओखा विभाग, विरमगाम-गांधीधाम-भुज हा विभाग सर्वात संवेदनशील आहे. दरम्यान, मुंबई किनारपट्टी भागात बुधवारी देखील वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किलोमीटर दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होणार आहेत.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
बिपरजॉय चक्रीवादळामुळं 15 आणि 16 जून रोजी कच्छ आणि गुजरातच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. समुद्रात जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एका उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं असून अरबी समुद्राला उधाण आल्याचं दिसत आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातमधील खाऊ पोर्ट ओलांडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: