ODI World Cup 2023 : यंदा ऑक्टोबर महिन्यात वन डे क्रिकेट वर्ल्डकप (ODI World Cup 2023 in India) होणार आहे, ज्याचं यजमानपद भारताकडे (India News) आहे. महत्त्वाचं म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Ahmedabad's Narendra Modi Stadium) रंगणार आहे. याच मुद्द्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) याबाबत काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण पाकिस्तानी संघानं (Pakistan Cricket Team) भारतात खेळण्यास बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत, तर आशिष शेलार हे खजिनदार आहे. त्यामुळे या सामन्याबाबत ठाकरे गट आणि शिवसेना काय भूमिका घेतात, ते पाहावं लागेल. 


आगामी वन डे विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद यंदा भारताकडे आहे. बीसीसीआयनं प्राथमिक वेळापत्रकाचा ड्राफ्ट आयसीसीला सादर केला आहे. या ड्राफ्टला आयसीसी आणि सहभागी देशांकडून मंजुरी मिळाली की, पुढील आठवड्यात वन डे विश्वचषकाचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. दरम्यान, प्राथमिक वेळापत्रकानुसार, आगामी विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्याचं आणि अंतिम सामन्याचं यजमानपद अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला बहाल करण्यात आलं आहे. अशातच हिंदुत्व आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची कास धरुन सत्तेत बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


'या' दिवशी भिडणार टीम इंडिया अन् पाकिस्तान 


ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, गतविजेता इंग्लंड आणि गतवेळचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानं अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरला विश्वचषक स्पर्धेची सुरुवात होईल. तसेच, भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. वर्ल्डकपमधील टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.


इतर मोठ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड 29 ऑक्टोबरला धरमशाला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड 4 नोव्हेंबरला अहमदाबाद आणि 1 नोव्हेंबरला पुण्यात न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आमनेसामने विश्वचषक स्पर्धेत आमने-सामने येतील. भारतीय क्रिकेट संघ ग्रुप स्टेजमध्ये 9 शहरांमध्ये खेळणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी संघाचे ग्रुप स्टेजमधील सामने पाच ठिकाणी होणार आहेत. 


टीम इंडियाचं विश्वचषकातील संपूर्ण शेड्यूल 


8 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान, चेन्नई 
11 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान, दिल्ली 
15 ऑक्टोबर vs पाकिस्तान, अहमदाबाद 
19 ऑक्टोबर vs बंग्लादेश, पुणे 
22 ऑक्टोबर vs न्यूजीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर vs इंग्लंड, लखनऊ 
2 नोव्हेंबर vs क्वालिफायर, मुंबई 
5 नोव्हेंबर vs साऊथ अफ्रीका, कोलकाता 
11 नोव्हेंबर vs क्वालिफायर, बंगळुरू


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ind vs Pak ODI WC : मौका... मौका... वर्ल्डकपमध्ये 'या' दिवशी भिडणार टीम इंडिया अन् पाकिस्तान; पाहा संपूर्ण शेड्यूल