Morning Headlines 9th August: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
'महाराष्ट्रातली युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही'; एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे असं पंतप्रधान मोदी (PM Modi) एनडीए (NDA) खासदारांच्या बैठकीत म्हणाले. एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील त्यांनी दाखला दिला. यापुढे देखील आपल्याला एनडीए म्हणून काम करायचं आहे, काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही. त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असंही मोदी म्हणाल्याचं कळतंय. (वाचा सविस्तर)
अविश्वास ठरावावरील चर्चेत सरकारवर विरोधकांचा वार, अमित शाह आज करणार पलटवार; पहिल्या दिवशी काय घडलं?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) चर्चा सुरु आहे. आज (9 ऑगस्ट) चर्चेचा दुसरा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (वाचा सविस्तर)
देशभरात नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या किती? मंत्री रुपाला यांची लोकसभेत सविस्तर माहिती
भारतीय पशुवैद्यकीय परिषदेनं (Veterinary Council of India) संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात 81 हजार 938 पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात 10 हजार 570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर (veterinary doctors) आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत नोंदणी झालेल्यांची ही माहिती आहे. (वाचा सविस्तर)
आठ राज्यांतील 4 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली; केंद्र सरकारची माहिती
आठ राज्यांमध्ये सुमारे 4.09 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यात आली असून या गटात आंध्र प्रदेश आघाडीवर आहे, अशी माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी संसदेला दिली. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, ओडिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि तामिळनाडू ही आठ राज्ये आहेत. (वाचा सविस्तर)
नवऱ्याने Ex च्या खात्यात पाठवले पैसे? ट्विटरवर नवरा-बायकोचं संभाषण व्हायरल
आजकालच्या युगात जोडप्यांमधील गमतीशीर किस्से सोशल मीडियावर (Social Media) फार व्हायरल होतात. असंच एका जोडप्यामधील संभाषण सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. नुकतंच ट्विटरने (Twitter) आपलं नाव आणि लोगो बदलून 'X' ठेवला आहे. ट्विटर युजर्सकडून ब्लू टिकसाठी पैसे देखील आकारतो, ज्यासाठी महिन्याला 700-800 चा खर्च येतो. (वाचा सविस्तर)
कच्च्या तेलाच्या दरांत घट; देशात पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती काय?
देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी दर वाढलेही आहेत. जर कच्च्या तेलाबद्दल बोलायचं झालं तर, सततच्या वाढीनंतर आज कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतींत 0.15 टक्क्यांची किंचित घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. (वाचा सविस्तर)
कर्क, कन्या धनुसह 'या' राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक लाभाची संधी; वाचा सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
वृषभ राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तर तूळ राशीच्या बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. आज कुंभ राशीला सावध राहण्याची गरज आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा बुधवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य (वाचा सविस्तर)
'चले जाव' चळवळीची सुरुवात, अमेरिकेने नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला; आज इतिहासात
इतिहासात आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. आज 9 ऑगस्ट, म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन आहे. भारताच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. ब्रिटीशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपलं शेवटचं स्वातंत्र्य युद्ध 'भारत छोडो', 'चले जाव' आंदोलनाच्या रूपात लढण्याची घोषणा केली होती
(वाचा सविस्तर)