एक्स्प्लोर

Morning Headlines 8th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

IND vs AUS, World Cup 2023: विश्वचषकात आज कांगारुंशी सलामी, गिलबाबत अनिश्चितता; 12 वर्षांपासूनचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडिया मैदानात

World Cup 2023: विश्वचषक 2023 स्पर्धेतील (ODI World Cup 2023) टीम इंडियाच्या (Team India) मोहिमेला आजपासून चेन्नईत सुरुवात होत आहे. टीम इंडिया (Indian Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर ही लढाई रंगणार आहे. या दिवसरात्र सामन्यात भारतीय सलामीवीर शुभमन गिलचा सहभाग अनिश्चित आहे. गिलला डेंग्यूचं निदान झाल्यानं तो या सामन्यात खेळणार नसल्याचे संकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं दिले आहेत. अलिकडेच भारतात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियानं 2-1 नं विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. असं असलं तरीही ऑसी टीमची लढाऊ वृत्ती त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ नक्कीच करणार नाही, हे निश्चित. भारतीय फलंदाजी आणि कांगारुंची गोलंदाजी यात प्रामुख्यानं द्वंद्व रंगताना पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर 

IND vs AUS Weather Forecast: टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात पावसाचा वरचष्मा? कसं असेल चेन्नईतील हवामान?

ICC Cricket World Cup 2023: विश्वचषकाचा (ODI World Cup 2023) महासंग्राम 5 ऑक्टोबरपासून सुरू झाला असला तरी भारतातील क्रिकेट प्रेमी आजच्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत होते. त्याचं कारण म्हणजे, आजपासून टीम इंडिया (Team India) आपला विश्वचषकातील प्रवास सुरू करणार आहे. विश्वचषकात वरचष्मा असणाऱ्या ऑसी संघाविरोधात (Australia) टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील आपला पहिला सामना खेळणार आहे. वाचा सविस्तर 

Israel-Palestine War : इस्रायल-हमासमध्ये युद्धाचा भडका! मृतांची संख्या 300 वर, 1590 जखमी; हमासने इस्रायलींना ठेवलं ओलिस

Israel-Palestine Escalation : इस्रायल (Israel) वरील हमासच्या हल्ल्यातील मृतांची संख्या 300 वर पोहोचली आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्या लोकांची संख्या 300 च्या पुढे गेली आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती टाइम्स ऑफ इस्रायलने दिली आहे. या हल्ल्यात सुमारे 1,590 लोक जखमी झाले आहेत. हमासचे अतिरेकी आणि इस्रायली सैनिक यांच्यामध्ये गाझापट्टी संघर्ष सुरुच आहे, त्यामुळे मृतांची संख्या वाढतच जाणार आहे. इस्त्राइल (Israel) आणि पॅलेस्टिनी (Palestine) दहशतवादी संघटना 'हमास' (Hamas) यांच्यातील संघर्ष फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. वाचा सविस्तर 

Israel-Hamas Conflict : हमास विरुद्धच्या युद्धात अमेरिका इस्रायलच्या पाठिशी, इस्त्रायल पंतप्रधानांच्या संपर्कात, राष्ट्राध्यक्ष बायडन यांची माहिती

Hamas Israel Attack : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Hamas) ने इस्रायल (Israel) वर हल्ला केल्यानंतर जगभरातील देश इस्रायलच्या समर्थनार्थ उतरले आहेत. महासत्ता अमेरिकेने हमास विरुद्धच्या युद्धात इस्रायलला पाठिंबा दिला आहे. हमास विरुद्धच्या युद्धात अमेरिका इस्रायलच्या पाठिशी असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी दिली आहे. इस्त्रायल पंतप्रधानांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. इस्रायलच्या समर्थनार्थ मोठं पाऊल उचलण्याचा इशारा देत अमेरिकेने युद्धात सर्व प्रकारच्या मदतीसाठी तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. वाचा सविस्तर 

Israel-Hamas Conflict : हमासचे नागरिक असलेली ठिकाणं संपवू, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांचा हमासला इशारा

Israel-Palestine Conflict : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष आता आणखी पेटला आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Hamas) आणि इस्रायल यांच्यात सध्या युद्ध (Israel-Palestine War) सुरु आहे. हमासने गाझापट्टी रिकामी करा, असा गंभीर इशार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यानाहू (Benjamin Netanyahu) यांनी दिला आहे. हमासने गाझापट्टी रिकामी करा, नाहीतर जोरदार कारवाई करु, असा गंभीर इशारा इस्रायलच्या पंतप्रधानांनी (Prime Minister of Israel) हमासला दिला आहे. ज्या ठिकाणी हमासचे नागरिक आहेत, ते ठिकाण संपवून टाकण्याचा गंभीर इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यानाहू यांनी दिला आहे. वाचा सविस्तर 

Amitabh Bachchan : तालिबानकडून बिग बींचं कौतुक; यापूर्वी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही केलेला अमिताभ बच्चन यांचा गौरव

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. बिग बी (Big B) यांची लोकप्रियता फक्त देशापुरतीच मर्यादित नसून परदेशातही त्यांची चांगलीच क्रेझ आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही ते फिल्मी दुनियेत रमले आहेत. आजही ते वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवत आहेत. प्रकृतीच्या समस्यांवर मात करत ते नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालेत. अशातच आता तालिबानने (Taliban On Amitabh Bachchan) मेगास्टार अमिताभ बच्चन यांचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. वाचा सविस्तर 

8 October In History : भारतीय वायुदलाची स्थापना, तर भूकंपामुळे काश्मीर हादरलं; आज इतिहासात

मुंबई : 8 ऑक्टोबर 1932 रोजी  इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना करण्यात आली. तर आजच्याच दिवशी काश्मीरमध्ये 7.6 रिश्टरचा भूकंप झाला. यामध्ये सुमारे 86,000 ते 87,000 हजार लोक मृत्यूमुखी पडले. तर 72,500 जण जखमी झाले आणि 2.8 दशलक्ष लोक बेघर झाले. आजच्याच दिवशी 1962 रोजी  नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला. थॉमस एरिक डंकन - इबोलाचे निदान झालेल्या अमेरिकेमधील पहिल्या व्यक्तीचे निधन झाले. फ्रँकलिन नॅशनल बँक - अमेरिकेतील बँक फसवणूक आणि गैरव्यवस्थापनामुळे कोसळली. अलेक्झांडर सोलझेनित्सिन यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.स्वातंत्र्यवीर सावरकरांचा डी-लिट पदवीने सन्मान करण्यात आला. वाचा सविस्तर 

Horoscope Today 8 October 2023 : आजचा रविवार तूळ, कर्क राशीच्या लोकांसाठी फायद्याचा, 12 राशींचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 8 October 2023 : आज रविवार, 8 ऑक्टोबर रोजी चंद्र स्वतःच्या राशीत कर्क राशीत जाणार आहे. याशिवाय रविपुष्य योग, सिद्ध योग आणि पुष्य नक्षत्र यांचाही प्रभाव राहील. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, तर तूळ राशीच्या लोकांना अडकलेला पैसा मिळेल. कुंभ राशीच्या लोकांचे त्यांच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावर वाद होऊ शकतात. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींवर रविवारचा काय प्रभाव राहील हे जाणून घेऊया, वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget