Morning Headlines 07th December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Lok Sabha Elections: लोकसभेचा 'मत' संग्राम मार्चमध्ये, फेब्रुवारीत आचारसंहिता लागणार; अर्थसंकल्पानंतर होणार घोषणा
नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election) कधी लागणार? असा प्रश्न संपूर्ण देशाला पडलाय. मात्र आता त्याची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिलीय. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यात मिळवलेल्या विजयामुळं भाजपचा (BJP) आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. त्यामुळं विजयाची घोडदौड कायम राहावी हा भाजपचा प्रयत्न असणार आहे. जानेवारीत होणारं राम मंदिराचं (Ram Mandir) लोकार्पण आणि 1 फेब्रुवारीला सादर होणारा अंतरिम अर्थसंकल्प यानंतर थेट लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. वाचा सविस्तर
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; मराठा आरक्षणाचं काय? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार? याकडे राज्याचं लक्ष
Maharashtra Assembly Winter Session 2023: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) आजपासून नागपुरातून (Nagpur) सुरुवात होणार आहे. आजपासून पुढचे 10 दिवस महाराष्ट्राची (Maharashtra News) उपराजधानी नागपुरातलं वातावरण तापणार आहे. पुढचे 10 दिवस नागपूर राजकीय घडामोडींचं केंद्र असेल. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
Deepfake Video Of Ratan Tata: रतन टाटांच्या शिफारसीनंतर गुंतवणूक करत असाल, तर वेळीच सावध व्हा! दिग्गज उद्योजकांनी स्वतःच केलंय अलर्ट
Deepfake Video Of Veteran Industrialist and Former Tata Group Chairman Ratan Tata: मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या डीपफेक व्हिडीओचा (Deepfake Video) प्रश्न ऐरणीवर आहे. डीपफेक व्हिडीओच्या माध्यमातून मोठ्या व्यक्तींच्या चेहऱ्याचा वापर करुन फसवणूक केली जात आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींशिवाय, आता सोशल ठगांनी ज्येष्ठ उद्योगपती (Veteran Industrialist) आणि टाटा समूहाचे (Tata Group) माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनाही लक्ष्य केलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. ज्यामध्ये जोखीममुक्त आणि 100 टक्के हमीसह 'हायप्ड गुंतवणूक' करण्यासाठी रतन टाटा यांच्या नावाचा वापर करुन गुंतवणूक करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर
रोहित, विराट, बिग बी ते अंबानी; रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 7 हजार जणांना आमंत्रण, 22 जानेवारीला भव्य सोहळा
Ayodhya Ram Lalla New Teample: अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. अयोध्येतील नव्या भव्य दिव्य राम मंदिरा रामलल्लांच्या अभिषेक प्रसंगी देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे. कलाकार, साहित्यिक, धार्मिक नेते आणि क्रीडा जगतातील मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. या प्राण प्रतिष्ठेसाठी 7 हजार जणांना आमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 22 जानेवारीला अयोध्येतील नव्या राम मंदिराचे उद्घाटन (Ayodhya Ram Lalla New Grand Teample) करतील आणि त्यांच्या हस्ते रामलालाचा अभिषेकही केला जाईल. वाचा सविस्तर
7th December History: आजच्या दिवशी इतिहासात नेमकं काय घडलं? एका क्लिकवर सविस्तर माहिती
7th December 2023 In History: सात डिसेंबर (7th December) हा दिवस अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आजच्या दिवशी जगभरात अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी इतिहासात नेमकं काय घडला याबाबतची माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून पाहत असतो. वाचा सविस्तर
Horoscope Today 7 December 2023 : आजचा गुरूवार खास! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य
Horoscope Today 7 December 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 7 डिसेंबर 2023 गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांना आज नोकरीत बढती मिळू शकते. आज कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या कुटुंबाकडून खूप समाधान मिळेल, सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर