Morning Headlines 6th January : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Weather Update : पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, 'या' राज्याला येलो अलर्ट
Weather Update Today : देशात कुठे ठंडी (Winter) तर कुठे पाऊस (Rain) असं चित्र पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे, तर दक्षिण भारतात पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील भागात दाट धुक्यासह थंडीचा कडाका वाढला आहे. धुक्यामुळे दुष्यमानता कमी झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यामध्ये पुढील 48 तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
Maharashtra Weather : वीकेंडला पावसाची हजेरी, पुढील 48 तास राज्यातील हवामान कसं असेल?
Maharashtra Weather Update Today : राज्यात पुढील 48 तासात पावसाची रिमझिम (Unseasonal Rain) पाहायला मिळेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील तापमानात थोडा बदल पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या राज्यातील काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांत कोकणासह काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर...
Aditya L1 : भारत आणखी एक इतिहास रचण्यासाठी सज्ज! आदित्य L-1 ची आज खरी परीक्षा, ISRO नं दिली माहिती
ISRO Solar Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रो (ISRO) आणखी एक इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. इस्रोची (ISRO) सौर मोहीम आदित्य L1 (Aditya-L1) आज अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे. इस्रोने याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने सांगितले आहे की, भारताची पहिली अंतराळ-आधारित सौर वेधशाळा आदित्य एल1 अंतराळयान पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या अंतिम कक्षेत ठेवण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. वाचा सविस्तर...
6th January In History : मराठी पत्रकार दिन, विजय तेंडुलकरांचा जन्म, ओम पुरींचे निधन; आज इतिहासात...
6th January In History: इतिहासात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. अनेक घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 6 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल (Louis braille Death Anniversary) यांचं आजच्याच दिवशी 1809 साली निधन झालं होतं. आज म्हणजेच मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज सुरू केले. त्यामुळे आजचा दिवस मराठी पत्रकार दिन (Marathi Patrakar Din) म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. प्रसिद्ध नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर (Vijay Tendulakar) यांचा जन्म आजच्याच दिवशी मुंबईत झालेला. आज संगीतकार ए.आर.रहमान (A. R. Rahman) तसेच माजी क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांचा वाढदिवस आहे. वाचा सविस्तर...
Horoscope Today 6 January 2024 : आजचा शनिवार खास! कोणत्या राशीवर असेल शनिदेवांची कृपा? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 6 January 2024 : राशीभविष्यानुसार 6 जानेवारी 2024 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, सिंह राशीच्या मोठ्या धान्य व्यापाऱ्यांना आज मंदीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे तुम्ही तुमचा साठा अधिक वाढवावा. वृश्चिक राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे आज तुमच्या कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. सर्व राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...