देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
MLA Disqualification Case: सुधारित वेळापत्रक सादर करण्यास विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी; आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
MLA Disqualification Case: सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज (30 ऑक्टोबर, 2023) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या (Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar) दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे. गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना अत्यंत कठोर शब्दांत खडसावलं होतं. तसेच, आम्ही विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकाबाबत असमाधानी आहोत. सॉलिस्टर जनरल यांनी दसऱ्याच्या सुट्टी दरम्यान विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करावी आणि सुधारीत वेळापत्रक द्यावं, असं स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले. तसेच, अध्यक्षांनी माध्यमांशी कमी बोलावं, कारण कोर्टही टीव्ही पाहत असतं, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) सणसणीत टोला देखील हाणला होता. वाचा सविस्तर
IND vs ENG : विश्वचषकाच्या इतिहासात भारताची ऐतिहासिक कामगिरी, इंग्लंडच्या नावे लाजिरवाणा विक्रम
India vs England : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये भारताने इंग्लंडचा (IND vs ENG) पराभव केला. यंदाच्या विश्वचषकात टीम इंडिया (Team India) चा हा सलग सहावा विजय आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले असून सर्व सामने जिंकले आहेत. वाचा सविस्तर
Andhra Pradesh Train Accident : मोठी बातमी! आंध्र प्रदेशात दोन ट्रेनचा भीषण अपघात; 11 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी
Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. दोन ट्रेन एकमेकांवर आदळून मोठी दुर्घटना घडली आहे. दोन पॅसेंजर ट्रेनची एकमेकांसोबत टक्कर झाली आणि रेल्वेचे तीन डबे घसरले. या भीषण रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यासोबतच या दुर्घटनेत 50 जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. एएनआयच्या एजन्सीच्या वृत्तानुसार, विझियानगरम जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी एक प्रवासी ट्रेन दुसऱ्या ट्रेनला धडकल्याने हा अपघात झाला. अलमांडा आणि कंटकपल्ले सेक्शन हा अपघात घडला. वाचा सविस्तर
Weather Update : राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, 'या' भागात पावसाचा अंदाज; पर्वतीय भागात बर्फवृष्टी, देशभरात आजचं हवामान कसं असेल?
Weather Update Today : राज्यासह देशातील विविध भागात गुलाबी थंडीची चाहूल (Cold Weather) लागली आहे. सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Monsoon Alert) सुरु आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, तामिळनाडू, केरळमध्ये आज म्हणजेच सोमवारी पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, लेह, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभाग (IMD) ने वर्तवला आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटची झळ बसल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. त्यामुळे राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. वाचा सविस्तर
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची कामगिरी कशी? राजस्थानमध्ये गेहलोतांची जादू की भाजपची शिष्ठाई; सर्वेक्षणातून जनतेचा धक्कादायक कौल
ABP News CVoter Survey: राजस्थान विधानसभा निवडणुकीची (Rajasthan Assembly Elections 2023) तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबतच मतदारांचीही धाकधूक वाढत आहे. राज्यात सुमारे 30 वर्षांपासून सुरू असलेली दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा कायम राहणार की सत्ताधारी काँग्रेस सत्ता राखून विक्रम निर्माण करणार, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. वाचा सविस्तर
Ola-Uber मध्ये सीसीटीव्ही आणि पॅनिक बटण! महिलांच्या सुरक्षेसाठी यूपी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात कधी?
Ola-Uber Cab Service : महिलांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकार (Uttar Pradesh Government) ने मोठा निर्णय घेतला आहे. ओला (Ola), उबर (Uber) कॅब (Cab Service), प्रायव्हेट वाहने (Private Vehicle) आणि सिटी बस (City Bus) मध्ये आता सीसीटीव्ही (CCTV Camera) आणि पॅनिक बटण (Panic Button) बसवण्यात येणार आहे. याशिवाय वृद्ध आणि अपंगांनाही उत्तम सुविधा मिळण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर
ग्रॅज्युएशनंतर सरकारी नोकरीच्या शोधात आहात? 'ही' संधी सोडू नका; करन्सी नोट प्रेसमध्ये मोठी भरती!
Currency Note Press Nashik Jobs 2023: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी. करन्सी नोट प्रेस (Currency Note Press) नाशिकमध्ये (Nashik) अनेक पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे. यामार्फत 117 पदांवर भरती केली जाईल. करन्सी नोट प्रेस नाशिकनं जारी केलेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर आहे. वाचा सविस्तर
Israel Hamas War : इस्रायल हमास युद्धात निष्पाप चिमुकल्यांचा बळी, संघर्षात 3000 हून अधिक बालकांचा मृत्यू
Israel Hamas War Update : इस्रायल आणि हमास (Israel Hamas Conflict) यांच्यातील युद्धाला तीन आठवड्यांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी, तरी हा संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हमासने इस्रायलवर हल्ला करत या युद्धाला सुरुवात केली. त्यानंतर इस्रायलने युद्धात उतरत हमासचा नायनाट करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे इस्रायलकडून गाझा पट्टीतील हल्ले तीव्र करण्यात आले आहेत. इस्रायली लष्कर गाझामध्ये घुसून हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करत आहे. दरम्यान, या युद्धात निर्दोष चिमुकल्यांचाही बळी जात आहे. वाचा सविस्तर
30 October In History : डॉ. होमी भाभा यांचा जन्म, रशियाच्या हायड्रोजन बाँब चाचणीने जगभरात खळबळ, आज इतिहासात
मुंबई: अणुबाँब आणि त्याच्या विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस हा भारत आणि जगाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दिवस आहे. आजच्याच दिवशी भारतीय अणुउर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. होमी भाभा (Dr Homi Bhabha) यांचा जन्म झाला होता. तर अमेरिकेसोबत अणुबाँबच्या स्पर्धेत उतरलेल्या सोव्हिएत रशियाने 30 ऑक्टोबर 1961 रोजी हायड्रोजन बाँबची चाचणी केली. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. यासह आजच्या दिवशी घडलेल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे... वाचा सविस्तर
Horoscope Today 30 October 2023 : आठवड्याचा पहिला दिवस 'या' राशींसाठी चांगला! नशीब त्यांच्या बाजूने असेल, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 30 October 2023 : आज सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी, चंद्र मेष नंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच राहू मेष राशीतून मीन राशीत आणि केतू तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. याशिवाय सर्वार्थ सिद्धी योग, व्यतिपात योग आणि कृतिका नक्षत्र यांचाही प्रभाव राहील. नक्षत्रातील या बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना प्रगतीची बातमी मिळून मानसिक शांती मिळेल आणि तूळ राशीच्या लोकांना पैसा येत राहील. मीन राशीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावे. ग्रह-ताऱ्यांचा हा बदल अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे, तर काही राशींना चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते.आठवड्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी ग्रहांच्या स्थितीत कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर